Ticker

6/recent/ticker-posts

हिमायतनगर शहराचा विकास करायचा असेल तर नगरपंचायत भाजपाच्या ताब्यात दया खासदार आशोकराव चव्हाण....


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड :-हिमायतनगर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसात होणार आहेत त्या अनुषंगाने येथील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले
 या उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार अशोक चव्हाण यांनी असे सांगितले की नांदेड जिल्ह्यात शिंदेसेना व भाजपा ही नैसर्गिक युती आहे. स्थानिक आमदार बाबुरावजी कोहळीकरांची ईच्छा असेल तर आम्ही येथे युती करायला तयार आहोत. अन्यथा स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे. लोकाच्या मनातील उमेदवार असला पाहिजे. जो प्रमाणिक काम करेल पक्षाला पुढे घेऊन जाईल अशा उमेदवाराची निवड करा पक्षाची ताकद वाढवा,सता आपली आणा ,मग विकास तुमच्या मनासारखा होईल. नगर पंचायतीवर भाजपाची सत्ता द्या आणि विकास तुमच्या हातीने करून घ्या असे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये उपस्थित कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांना सांगितले यावेळी हिमायतनगर शहरात भाजपाची मोठी ताकद खा. अशोकराव चव्हाण यांना पहायला मिळाली या कार्यक्रमानंतर त्यांनी शहराचे ग्रामदैवत श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथील श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना केली व मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ यांच्याकडून सत्कार स्वीकारला यावेळी भाजपा प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी  श्रावण पाटील भिलवंडे, रामचंद्र मुसळे, हदगाव तालुका अध्यक्ष भागवत देवसरकर, मारोती पाटील, विशाल माने,कल्याण सिंग ठाकूर, सुरेशभाऊ सारडा, मुनेश्वर ताई सह आदीजण मोठ्या संख्यने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवराचा भारतीय जनता पार्टीचे ता.अध्यक्ष गजानन चायल,शहराध्यक्ष  विपुल दंडेवाड,  सोशल मीडिया जिल्हा संयोजक नागेश शिंदे, रामेश्वर शक्करगे लक्ष्मण डांगे, महिला अध्यक्षा सुवर्णाताई वारकड, कौशल्या रुघेताई सह आदिनी सत्कार केला व कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत गजानन चायल  यांनी खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासमोर शहरातील अनेक समस्या सांगितल्या या प्रसंगी शहरा सह तालुक्यातील भाजपा  पदाधिकारी,कार्यकर्ते, महिला पदाधिकारी मोठ्या युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या