Ticker

6/recent/ticker-posts

मुलीच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम: शेतकऱ्यांना रोपे वाटप


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 धुळे  :-दिनांक 28/10/2025 रोजी चौगाव ता.जि. धुळे येथील प्रगतशील व युवा शेतकरी श्री. विनोद सीताराम पाटील यांनी त्यांची कन्या लावण्या हिचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी वाढदिवसानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षारोपण केले तसेच गावातील शेतकऱ्यांना फळझाडांची रोपे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. 
सध्याच्या काळात वाढदिवस केवळ एक आनंदाचा सोहळा न राहता, एक सामाजिक जबाबदारी म्हणूनही पाळला जात आहे.युवा शेतकरी श्री विनोद सीताराम पाटील यांनी या उपक्रमातून तरुण पिढीला एक आदर्श घालून दिला आहे. या उपक्रमांतर्गत यांनी लोकांना रोपे वाटप केले आणि त्याची आयुष्यभर काळजी घेण्यास प्रोत्साहित केले. हे रोप फक्त एक झाड नसून, भविष्यातील एका चांगल्या वातावरणाची सुरुवात आहे, असे त्यांनी सांगितले. 
या उपक्रमामुळे, आजूबाजूच्या परिसरात हिरवळ वाढण्यास मदत होईल आणि पर्यावरणाचे संरक्षण होईल. यावेळी कार्यक्रमप्रसंगी  इतर शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या