Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादीचा दणका करंजी जी.प. शाळेला मिळाला शिक्षक

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड :-हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथील शाळेला बऱ्याच दिवसापासून शिक्षक मिळत नसल्यामुळे संबंधित गावकरी मंडळी व पालक वर्ग चिंतेत होते. मग शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य माधव पाटील कदम करंजीकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष वामन पाटील मिराशे यांच्याशी फोन द्वारे शिक्षक मिळवून देण्याची विनंती केली त्यांनी काल लागलीच बि ओ साहेबांशी फोनवर चर्चा करून करंजी जि प शाळेला शिक्षक द्या अशी विनंती केली ती विनंती मान्य करून संबंधित अधिकाऱ्यांनी करंजी जि प शाळेला शिक्षक उपलब्ध करून दिल्याबद्दल बि ओ  साहेबाचे  व शिक्षक मिळवून देणाऱ्या राष्ट्रवादी तालुका अध्य वामन पाटील मिराशे यांचे  करंजी येथील पालक वर्गातून स्वागत होत आहे संबंधित शिक्षक हा आज रोजी शाळेमध्ये उपलब्ध झाल्यावर त्या शिक्षकाचा समस्त गावकरी मंडळी व शालेय व्यवस्थापन  समितीचे अध्यक्ष सदस्य यांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या