चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई :-गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जाहीर केला. आज (सोमवार) सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद घेऊन वाघमारे यांनी महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यामुळे आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.पुढे ते म्हणाले, २९ महापालिकांच्या २ हजार ८६९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यात १ हजार ४४२ महिला असून अनुसूचित जाती ३४१, अनुसूचित जमाती ३७७ आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ७५९ जागा राखीव आहेत . या निवडणुकीसाठी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर उमेदवारी अर्जाची छाननी ३१ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. तसेच उमेदवारांना उमेदवारी अर्ज ०२ जानेवारी २०२६ पर्यंत मागे घेता येणार आहे. तर मतदान १५ जानेवारीला होणार असून, मतमोजणी १६ जानेवारी २०२६ रोजी होईल, असेही दिनेश वाघमारे यांनी सांगितले.
-------(बॉक्स-----------------निवडणूक कार्यक्रम
---------------------------
अर्ज भरण्याची तारीख – २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
अर्ज छाननीची तारीख – ३१ डिसेंबर २०२५
अर्ज मागे घेण्याची तारीख – ०२ जानेवारी २०२६
निवडणूक चिन्ह वाटप, अंतिम उमेदवार यादी – ०३ जानेवारी २०२६
मतदानाची तारीख – १५ जानेवारी २०२६
मतमोजणीची तारीख – १६ जानेवारी २०२६
--------(बॉक्स पूर्ण)-------
या महानगरपालिकांच्या होणार निवडणुका
१) अहिल्यानगर महानगरपालिका २) अकोला महानगरपालिका ३) अमरावती महानगरपालिका ४) भिवंडी निजामपूर महानगरपालिका ५) बृहन्मुंबई महानगरपालिका ६) चंद्रपूर महानगरपालिका ७) छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
८) धुळे महानगरपालिका ९) इचलकरंजी महानगरपालिका १०) जळगाव महानगरपालिका ११) जालना महानगरपालिका
१२) कल्याण डोंबिवली महानगरपालिका १३) कोल्हापूर महानगरपालिका १४) लातूर महानगरपालिका १५) मालेगाव महानगरपालिका १६) मीरा भाईंदर महानगरपालिका १७) नागपूर महानगरपालिका १८) नांदेड वाघाळा महानगरपालिका
१९) नाशिक महानगरपालिका २०) नवी मुंबई महानगरपालिका २१) पनवेल महानगरपालिका २२) परभणी महानगरपालिका २३) पिंपरी चिंचवड महानगरपालिका २४) पुणे महानगरपालिका २५) सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका २६) सोलापूर महानगरपालिका २७) ठाणे महानगरपालिका २८) उल्हासनगर महानगरपालिका
२९) वसई-विरार महानगरपालिका


0 टिप्पण्या