चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-ग्रीन हेरिटेज पर्यावरण समितीचे अध्यक्ष मो. सईद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल वर्मा, शाम कुकडे, पुरुषोत्तम समरीत, आत्माराम बेदरकर आदी पक्षीप्रेमींनी सकाळच्या वेळेस भंडारा जवळील टवेपार येथील तलावावर आलेल्या विदेशी पाहुणे पक्ष्यांचे(रेड क्रेस्टेड पोचार्ड व इतर)नुकतेच दर्शन घेतले. बर्ड वॉचींग करिता बडोदा येथून आलेल्या पक्षीतज्ज्ञ व नरेंद्र गुर्जर यांच्या बहिणी सुजाता तळेगावकर आणि भंडाऱ्याच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती लीना फाळके यांनी ही नुकतेच या तलावावर परदेशी पाहुणे "रेड क्रेस्टेड पोचार्ड" व इतर पक्षांचे निरीक्षण करून आपल्या कॅमेऱ्यात हे क्षण टिपले आणि आनंद व्यक्त केला.
या रमणीय तलावाच्या शांत व नीरव वातावरणात आपल्या परिसरात परदेशातून आलेल्या पाहुण्या पक्ष्यांचे निरीक्षण व बर्ड वॉचिंग करण्याचा अनुभव वेगळाच रोमांचक आणि आनंददायी असल्याचे मनोगत सर्व पक्षीप्रेमींनी व्यक्त केले.नुकतेच बर्ड वॉचींग करिता
या तलावात आढळणारे "रेड क्रेस्टेड पोचार्ड"हे पक्षी हिवाळ्याच्या हंगामात मध्य व दक्षिण युरोप (इंग्लंड) तसेच मध्य आशियातील देशांतून(मंगोलिया,सायबेरिया ई) भारतात येतात.भारतात आल्यानंतर ते तलाव, झील,नद्या मध्ये शरण घेतात आणि उन्हाळा सुरू होताच पुन्हा आपल्या देशात परत जातात.


0 टिप्पण्या