Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांग मूकबधिर व्यक्तीवर अमानुष अत्याचार – तात्काळ कठोर कारवाईची मागणी

 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
धाराशिव:- जिल्ह्यातील तुळजापूर येथे राजेश श्रीमंत पवार या दिव्यांग (मूकबधिर) व्यक्तीवर झालेला अमानुष अत्याचार संपूर्ण समाजाला हादरवणारा आहे. हा प्रकार केवळ गुन्हा नसून दिव्यांग व्यक्तींच्या असहायतेचा गैरफायदा घेत केलेले गंभीर शोषण आहे.
दिनांक 22/12/2025 रोजी घडलेल्या या प्रकरणात FIR दाखल असूनही आरोपी मोकाट फिरत आहेत व पीडितास धमकावत आहेत, ही बाब अत्यंत गंभीर आहे. IPC, दिव्यांग हक्क अधिनियम 2016 व शासन निर्णय दि. 13/11/2025 अस्तित्वात असतानाही कारवाई होत नसेल, तर हे कायद्याचे अपयश आहे.
 प्रहार दिव्यांग क्रांती संस्था (राज्य) यांच्या वतीने पोलिस अधीक्षक, धाराशिव यांच्याकडे निवेदन सादर करून
✔️ दोषींना तात्काळ अटक
✔️ कठोरात कठोर शिक्षा
✔️ पीडित दिव्यांग व्यक्तीस संपूर्ण पोलीस संरक्षण
यांची ठाम मागणी करण्यात आली आहे.
 “दिव्यांग व्यक्तींवरील अन्याय सहन केला जाणार नाही. प्रशासनाने तात्काळ न्याय न दिल्यास प्रहारचा लढा अधिक तीव्र केला जाईल.”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या