Ticker

6/recent/ticker-posts

नाटक हे सामाजिक प्रबोधनाचे सशक्त माध्यम — निलसनी पेडगांव येथे ‘अंधारातील लाल दिवा’ नाटकाचा भव्य प्रयोग; मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते उद्घाटन...

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 चंद्रपूर :-सावली तालुक्यातील मौजा–निलसनी पेडगांव येथे जय बजरंग नाट्यकला मंडळ, निलसनी पेडगांव यांच्या सौजन्याने आणि शिवचंद्र नाट्य रंगभूमी, वडसा प्रस्तुत ‘संगीत–अंधारातील लाल दिवा अर्थात स्त्री जन्मा तुझी कहाणी’ या सामाजिक, लावणीप्रधान व विनोदी नाटकाचा भव्य प्रयोग दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मा.खा.डॉ. अशोकजी नेते म्हणाले की, “नाटक हे समाजप्रबोधनाचे अत्यंत प्रभावी व सशक्त माध्यम आहे. समाजातील वास्तव घटना, व व्यथा कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम नाटक करत असते. ‘संगीत–अंधारातील लाल दिवा अर्थात स्त्री जन्मा तुझी कहाणी’ सारख्या सामाजिक आशयाच्या नाटकातून स्त्रीजीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला जातो आणि समाजाला सकारात्मक संदेश मिळतो. या नाट्यप्रयोगास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.”

या नाटय कार्यक्रमास मंचावर प्रामुख्याने गडचिरोलीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी बांधकाम सभापती जि. प. चंद्रपूर संतोष भाऊ तंगडपल्लीवार, तालुकाध्यक्ष किशोर वाकुडकर, कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा साथ फाऊंडेशनचे मालक रोहितभाऊ बोम्मावार, माजी भाजपा तालुकाध्यक्ष अर्जुन भोयर, ज्येष्ठ नेते अरुणजी पाल, माजी पंचायत समिती उपसभापती रविंद्र बोल्लीवार, भाजयुमो तालुका अध्यक्ष नितिन कारडे, माजी भाजयुमो तालुका अध्यक्ष विनोद धोटे, सावली शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, युवा नेते राकेश विरमलवार, जिल्हा सचिव सुरज किनेकर, डोनाळा उपसरपंच जितु सोनटक्के,कोंडेखलचे उपसरपंच नरेश बाबनवाडे,युवा नेते पुनम झाडे, डॉ. पवन कवठे, इमरान शेख, आशिष संतोषवार, नामदेव भोयर,निमगांव ग्रा.प.सदस्य किशोर खेडेकर, ग्रा.प.सदस्य संतोष पिपरे, विशाल करंडे, राहुल लोडेल्लीवार, येरमलवारजी, आकाश बुरेवार यांच्यासह नाटकाचे अध्यक्ष विनोद चिकराम तसेच पेडगांव येथील मान्यवर नागरिक, महिला, युवक व नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाट्यप्रयोगाच्या माध्यमाचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे रोहितभाऊ बोम्मावार, किशोर वाकुडकर यांच्यासह अनेक मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

पेडगांवच्या भूमीवर साकारलेला हा सांस्कृतिक सोहळा उपस्थित प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवणारा ठरला असून नाट्यप्रेमींनी या प्रयोगाला भरभरून दाद दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या