आरोपी विकास बावणे यास भद्रावती पोलिसांनी ताब्यात घेतले.
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : शहरातील मोटारसायकल चोरी प्रकरणात भद्रावती पोलिसांनी अचूक व नियोजनबद्ध कारवाई करून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत करत आरोपीस ताब्यात घेतले. दि.०४ नोव्हेंबर २०२५ रोजी फिर्यादी शंकर कवाडे रा. वडाळा तुकूम यांनी त्यांच्या गुलमोहर पार्क, गेट क्र.२, संताजी नगर, भद्रावती येथून CD डिलक्स मोटारसायकल किंमत अंदाजे २०,००० रुपये चोरीस गेल्याची तक्रार पोलीस ठाणे भद्रावती येथे अप. क्र.६०३/२५, कलम ३०३(२) अंतर्गत नोंदविली होती.
गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, रेकार्डवरील आरोपी विकास ऋषी बावणे रा. गुरुनगर, भद्रावती यास पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीकडून चोरी केलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. यामुळे सदर गुन्हा पूर्णपणे उघडकीस आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, अप्पर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, तसेच संतोष बाकल, उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पो. नि. योगेश्वर पारधी पोलीस ठाणे भद्रावती, पो. उपनि. गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, जगदीश झाडे, अनुप अस्तुंकर, विश्वनाथ चौधरी, गोपाल आतकुलवार, योगेश घाटोळे, रोहित चिडगिरे, खुशल कावळे, संतोष राठोड यांनी सहभाग घेतला होता.पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.


0 टिप्पण्या