चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपुर : अमित!तु एवढ्या लवकर जायला नको होता असा सूर आज अनेकांच्या मुखातून बाहेर पडला!मुलचा युवा पत्रकार अमित राऊत! काल त्याची रात्री प्राणज्योत मालवली.आज त्याची ही दुःखद बातमी दत्तात्रय समर्थ व अंकुश कामडी यांनी भ्रमणध्वनीवरुन कळविली.तेव्हा मन सुन्न झाले.पत्रकारितेत एक आगळा वेगळा ठसा अमितने अल्पकालावधीत उमटविला होता माझं गाव माझं चंद्रपूर ते सर्च टीव्ही पर्यंत अमितचा अविरतपणे प्रवास सुरू होता शालेय विद्यार्थ्यांपासून तर दिग्गज नेत्यांपर्यंत त्याने अनेकांच्या मुलाखती घेऊन त्या प्रसारित देखील केल्या होत्या! दिलदार मित्र म्हणून त्याची अख्ख्या मुलभर ओळख होती.सर्वसामान्य कुटुंबातील या युवा पत्रकाराने झेरॉक्स केन्द्र थाटून स्वतःचा एक व्यवसाय सुरु केला होता.फुटपाथवरील छोट्या व्यवसायिकांसाठी लढणारा अमित कायमस्वरूपी या जगातून निघून गेला असला तरी सदैव त्याच्या आठवणी आमच्या स्मरणात राहणार आहे.
अमितच्या जाण्याने महाराष्ट्रातील सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप पोरका झाला आहे.
दिवंगत मित्रास भावपूर्ण श्रद्धांजली!
पत्रकार: किरण घाटे व राजेश येसेकर


0 टिप्पण्या