Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर-हंडरगुळी-अहमदपुर रोडवर ऊसाची वाहतूक करणारे वाहन बनले यमराज ..!!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी:—राज्यात सगळीकडे कारखाने सुरु झाले असून जिल्ह्यातील अहमदपुर, देवणी,उदगीर या तालुक्यातील सा. कारखाने ही सुरु झाल्याने हंडरगुळी परिसरातील ऊस घेऊन जाणारे ट्रक, ट्रॅक्टर यांची वर्दळ या रोडवर मोठ्या प्रमाणात वाढली आहे.या वाहनात परवान्यापेक्षाही जास्त ऊस हा असतोच असतो.उलट परवाना नसतानाही २ मोठे साउॅंड लावून मोठ्या आवाजात गाणे विशेष करुन उडत्या चालीचे गाणे लावून चालक मंडळी डोळ्यावर २० रु.चा चष्मा लावून ट्रॅक्टर चालविताना जनतेला दिसतात.माञ,संबंधित यंञणेला दिसत नसल्याने कारवाई होत नसेल अशी चर्चा अन्य वाहनधारकांसह सामान्य जनतेतून होत आहे.
साखर कारखान्याच्या चिमन्या पेटल्याने ऊसाची वाहतूक करणारी वाहने वाढले असून ही वाहने म्हणजे एकप्रकारे यमराज आहेत.असे म्हणणे चुक ठरणार नाही.
कारण,ऊस वाहतूक करणारे अनेक ट्रॅक्टर मध्ये प्रखर लाईट्स,कर्कश आवाजाचे साऊंड्स,ओव्हर लोड ऊस आणी बेधूंद ड्रायव्हिंग यामुळे हे ट्रॅक्टर अनेकांच्यासाठी यमराज बनून या रोडवर अक्षरश: धुमाकूळ घालत असल्याचे बघून चिंता व्यक्त होतेय. तरीही याचे प्रशासनाला सोयरसुतक दिसत नाही.म्हणुन संताप पसरला आहे.
साउंडला परवानगी दिली कुणी ?
हा प्रश्न अन्य वाहनधारकांसह हाळी व हंडरगुळीकरांना ही सतावत आहे. कारण,अगोदरच प्रत्येक ट्रॅक्टरला मोठा आवाज असतो.त्यात मागच्या ट्राॅलीचा पण असतोच.आणि हे सर्व कमी आहे म्हणुन की काय ऊसाची वाहतूक करणारे बहूतांश ट्रॅक्टर मध्ये मोठ्या आवाजात २ दोन साउंड वाजवित स्टाईल मध्ये ट्रॅक्टर चालक मंडळी चालविताना दिसतात.आणि साउंडच्या आवाजामुळे पाठीमागे ऊस गळाल्याचे आणि वाहन हाॅर्न वाजवित असल्याचे ही समजेना. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरीही ट्रॅक्टर मध्ये साउंड वाजतात कुणामुळे व कुणाच्या परवानगीने ?
यंञणा कोमात;ओव्हरलोड वाहतूक जोमात..!
मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक ट्राॅलीत १५ टनापर्यंत ऊस भरता येतो.माञ,बहूतांश ट्रॅक्टर मध्ये ओव्हरलोड ऊस म्हणजे २५ टनाच्या आसपास भरला जातो.असे चालक मंडळीच बोलताना समजते.आणि या ओव्हरलोड ऊसामुळे अपघात वाढतात.आणि याची कल्पना असुन सुध्दा संबंधित यंञणा कुठल्या गुहेत बसलीय.
दोन-दोन ट्राॅली,अधिकारी कधी उतरणार गाडीच्या खाली ?
एकंदरीत चिञ पाहता या रोडवरुन सर्रासपणे ऊसाप्रमाणे कायद्यालाही चरख्यात चिरडत ऊसाची वाहतूक होत आहे.साधारणत: एक इंजन व एक ट्राॅली असे चिञ ऊस वाहतूक करणा-या ट्रॅक्टरचे सर्वञ दिसते. परंतू,या रोडवर २ इंजन-२ ट्राॅली तसेच १ इंजन,२ ट्राॅली असे चिञ दिसते.तर या रोडवर २,२ ट्राॅली व २ इंजन जोडून ट्रॅक्टर बेशिस्तीत व समोरचे २ ही टायर हवेत उडवित धावताना दिसतात.तरीही संबंधित अधिकारी त्यांच्या गाडीच्या खाली उतरत नसल्याने कारवाई करायचा सवालच पैदा होत नाही.
तत्कालीन आयपीएस.निकेतन कदम यांच्यासारखे धाडस करणार कोण ?
मोठमोठ्या आवाजात गाणे लावून बेशिस्तीत ऊसाची वाहतूक करणारी वाहने यमदुत बनुन अनेकांच्या जीवा वर उठल्याची ओरड कांही वर्षापुर्वी झाली असता,लातुरचे तत्कालीन प्रशिक्षणार्थी पोलिस अधिक्षक आयपीएस निकेतन कदम यांनी उप विभाग चाकूर हद्दीत मोटार वाहन कायदा मोडणा-या तसेच परवानगी नसतानाही साउंड सिस्टिम लावून ऊसाची वाहतूक करणा-या ट्रॅक्टर चालकांना रितसर चांगलीच समज दिली होती.व तशा बातम्या सोशल व प्रिंन्ट मिडियातून झळकल्या होत्या. म्हणुन तेंव्हा निकेतन कदम नावाचा दरारा संबंध जिल्ह्यात पसरला होता. म्हणुन आता ही तशीच गरज असून निकेतन कदम यांच्यासारखे धाडस करणार कोण ? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या