Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांग बांधवांचे कोणतेही प्रश्न यंत्रणांकडे प्रलंबित राहू नये--जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

दिव्यांगांप्रती संवेदनशीलता व जाणीव जागृती कार्यशाळा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
धाराशिव: दिव्यांगांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विभागाचा समन्वय असणे आवश्यक आहे. दिव्यांग हक्क अधिनियम हा कायदा देखील आहे. या कायद्याने त्यांचे मूलभूत अधिकार व कर्तव्य हे निश्चित केले आहे. दिव्यांग बांधव हा समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ मिळवून देताना त्यांचे कोणतेही प्रश्न यंत्रणांकडे प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. 

आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ कलम ३९ अन्वये दिव्यांगाप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून श्री. पूजार बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या.भाग्यश्री पाटील, केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्ती सशक्तीकरण समितीचे सदस्य सुरेश पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देवदत्त गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी सचिन इगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नागेश मापारी, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव, नवजीवन अपंग प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक चंद्रकांत जाधव, महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आप्पा ढोके व प्रहार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष मयूर काकडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्री.पूजार म्हणाले की, विविध योजनांचे अभिसरण करून दिव्यांग बांधवांना योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. विविध आरोग्यविषयक शिबिरांचे त्यांच्यासाठी आयोजन करण्यात येत असून यामधून त्यांना दिव्यांग वैश्विक ओळखपत्र देण्यात येत आहे. दिव्यांग बांधवांना लागणाऱ्या सहायक उपकरणांसाठी शिबिरांचे देखील आयोजन करण्यात येत आहे. दिव्यांग बांधव योजनांच्या लाभांपासून वंचित राहणार नाही याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात दिव्यांग बांधवांसाठी पुनर्वसन केंद्र लवकर सुरू करण्यात येणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या