Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपूरच्या रेल्वे धरणे आंदोलनाची माहिती सभागृहाला आ. किशोर जोरगेवार यांनी दिली....



चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर :-येथे मागील रेल्वे प्रवासी सेवा संघटनेतर्फे सुरू असलेल्या आंदोलनास आ. किशोर जोरगेवार यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या सविस्तरपणे ऐकून घेतल्या. या सर्व मागण्या हिवाळी अधिवेशनात मांडण्याची आणि त्या राज्य सरकारमार्फत केंद्र शासनापर्यंत पोहोचवण्याची ग्वाही त्यावेळी दिली होती.
  दरम्यान, आज पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून बोलताना ही बाब आ. किशोर जोरगेवार यांनी सभागृहासमोर पुन्हा अधोरेखित केली. महाराष्ट्र सरकारने तातडीने ही मागणी केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावी आणि चंद्रपूरची माता महाकाली ते कलकत्त्याची महाकाली अशी थेट रेल्वे सेवा सुरू सुरू करण्यात यावी, अशी भूमिका सभागृहात मांडली. तसेच, चंद्रपूरच्या प्रचंड प्रवासी गरजा, वाढता विद्यार्थी वर्ग, औद्योगिक वाहतूक आणि रोजगाराच्या संधी लक्षात घेता काही महत्त्वाच्या मागण्या सभागृहात उपस्थित केल्या.

चंद्रपूर–मुंबई डेली सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करावी
चंद्रपूर–नागपूर डेली शटल सेवा सुरू करावी गोंदिया दुरंतो एक्सप्रेसची सुरुवात चंद्रपूरहून करावी चंद्रपूर–कोलकाता महाकाली रेल्वे सेवा सुरू करावी
या सर्व मागण्या आज सभागृहात आमदार किशोर जोरगेवार यांनी मांडल्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या