चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे:- पुण्यात राजगुरुनगरमध्ये खाजगी क्लासमधील, भांडणातून दहावीच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. पुण्यात अल्पवयीन मुलांमध्येही गँगवॉर घडत आहेत. दहावीत शिकत असलेल्या मुलाने वर्गमित्रालाच संपवले आहे.शिक्षकांसमोरच एमाक दहावीच्या मूलाला चाकू भोसकून मारण्यात आले आहे. राजगुरुनगर येथे भल्या सकाळी खाजगी क्लासमध्ये लहान मुलांचे गँगवार घडल्याचं समोर आले आहे.
पुण्यातील गुन्हेगारी काही संपताना दिसत नाही. गेल्या काही वर्षांपासून पुण्यात अल्पवयीन मुलांमध्येही गँगवॉर होत असल्याचे समोर आले आहे. कोयत्या गँगवर नियंत्रण मिळवणे हे आधीच पुणे पोलिसांसमोर आव्हान असताना, आता पुण्यात गँगवॉर वाढू लागले आहे. आज सकाळी राजगुरूनगर येथे एक दहावीच्या मूलांच्या खूनाची घटना घडली आहे.
राजगुरूनगरमध्ये भल्या सकाळी खासजी क्लासमध्ये गँगवॉर घडले आहे. यात एका 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. खासगी क्लासमध्ये लहान मुलांमध्ये हे गँगवॉर घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच, या प्रकाराने पुण्यात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका अर्ल्पवयीन मुलावर त्याच्याच क्लासमध्ये शिकत असलेल्या मुलावर चाकूने हल्ला केला आहे. शिक्षक शिकवत असतानाच अल्पवयीन मुलाने मयत मुलाचा गळा चिरला. त्यानंतर तो मुलगा रक्ताच्या थारोळयात पडला होता. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्या मुलाचा मृत्यू झाला.
मृत मुलगा आणि हल्ला करणारा मुलगा दोघेही दहावीच्या वर्गात शिकत होते. अल्पवयीन मुलाने हल्ला का केला, याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. तसेच, हल्ला केल्यानंतर मुलगा दुचाकीवरुन फरार झाला होता. मात्र पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. तसेच, या घटनेचा कसून तपास केला जात आहे. मात्र या घटनेनंतर खाजगी क्लासमधील मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
पुणे जिल्हयातील , भोसरी ,चाकण व राजगुरूनगर, शिक्रापुर, मोशी, या भागातील औद्योगिक क्षेत्रात लहान मूलांच्या टपोरी गँगची दहशत वाढली आहे. पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रातील एका उच्चभ्रू सोसायटीच्या गेटसमोर टपोरी गँगकडून दोन तरुणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या गँगकडून यापूर्वीही संबंधित सोसायटीच्या परिसरात वारंवार गोंधळ घालून दहशत पसरवली जात होती. मात्र, यावेळी थेट हाणामारी करत तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणांनी गँगच्या दहशतीमुळे अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही. परिसरात या टोळीची दहशत इतकी वाढली आहे की नागरिक, विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


0 टिप्पण्या