Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा सरकारच्या काळात, राज्यात पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, मुंबईत गुंडांकडून पोलिसांवर हल्ला

चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई :-भाजपा सरकारच्या काळात, राज्यात पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबईत  गुंडांकडून अचानक पोलिसांवर हल्ला करण्यात आला आहे. या राज्यात आता मुंबई पोलिसही सुरक्षित नाही ,अशी परिस्थिती तयार झाली आहे. राज्यात आतापर्यत सर्व सामान्य जनतेवर अन्याय होत होता, सध्या राज्यात सरकारचे पोलिस ही सुरक्षित नाही, असे चित्र राज्यात दिसत आहे. राज्यात भाजपा सरकारच्या सगळीकडे गोंधळ चालला आहे, अशी सध्या स्थिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील कांदिवली पश्चिम एकता नगरमध्ये, मारामारीत सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांवर स्थानिक गुंडांनी अचानक हल्ला केला होता. भांडण सोडवायला गेल्यानंतर काही स्थानिक मुंबई पोलिसांची कॉलर पकडली, मुंबईच्या कांदिवलीत स्थानिक गुंडाकंडून पोलिसांना मारहाण करण्यात आली आहे, तर रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. आता राज्यात पोलिसांच्या ही सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
  मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या ज्या घटना समोर येत आहेत, त्यामधून त्यांना मुंबई पोलिसांची भीती नसल्याचे दिसून येत आहे. मात्र आता तर राज्यात गुन्हेगारांची हद्दपार झाली आहे. मुंबईच्या कांदिवली परिसरात कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर काही स्थानिक गुंडांनी अचानक हल्ला करून मुंबई पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तर या मुंबईतील पोलिसांच्या मारहाणीच्या घटनेमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबईत कांदिवली पश्चिमेत एकता नगर परिसरामध्ये रात्री नऊच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली होती, याच हाणामारीला सोडवण्यासाठी आणि आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीच्या टोळीकडून अचानक हल्ला करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, या स्थानिक गुंडांना पोलिसांची अजिबात भीती नाही आणि ते धाडसाने पोलिसांवर हात उचलत आहेत. या घटनेने मुंबईतील कांदिवली भागात काही काळ मोठया तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
  मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत कांदिवली पश्चिमेकडील एकता नगर परिसरात दोन गटांमध्ये मारामारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेमध्ये सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, यावेळी स्थानिक गुंडांनी पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी उलट पोलिसांवरच हल्ला केला आहे.
   या घटनेचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले असून यामध्ये काही गुंड पोलिसांना अडवताना आणि, त्यांच्याशी वाद घालताना, त्यांच्यावर हात उचलताना दिसून येत आहेत. यावेळी काही गुडांनी तर पोलिसांची कॉलर पकडल्याचे दिसून येत आहे. पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला केल्याने घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारातून स्थानिक गुंडांना मुंबई पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नसल्याचे चित्र दिसून येत आहे. 
  या घटनेनंतर मुंबईत कांदिवली पोलीसांनी मोठी अॅक्शन घेतली आहे. परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी त्वरित मोठा बंदोबस्त तैनात केला. तसेच, अतिरिक्त पोलीस फौजफाटा बोलावून एकता नगर आणि आसपासच्या भागामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी विभागातील सर्व संशयित गुंडांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली असून, मुंबई पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या मुख्य आरोपींविरोधात, गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास मुंबई पोलिसांकडून सुरू असून, या पोलिस मारहाण प्रकरणात कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. आता राज्यातील पोलिसांच्या सुरक्षेवर नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. राज्यातील भाजपा सरकारने या घटनेवर गांभीयाने लक्ष देण्याची गरज आहे, असे राज्यातील विरोधी पक्षांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या