Ticker

6/recent/ticker-posts

नवनित विद्यालय खमारी (बुज.) या शाळेची शैक्षणिक सहल

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा  :-दि. १०/१२/२०२५ ला मोतीस्मृती ज्ञानजागृत बहुउद्देशिय शिक्षण संस्था पेट्रोलपंप (ठाणा) ता. जि. भंडारा द्वारा संचालित नवनित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खमारी (बुज.) या शाळेची शैक्षणिक सहल वर्ग ८ ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी नागपूर येथील प्रेक्षणीय स्थळी आयोजित करण्यात आली. नागपूर येथील प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन  नवीन शैक्षणिक वातावरण व अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला तसेच प्रत्यक्ष ज्ञानाची अनुभूती झाली. विशेषत: यावर्षी प्रेक्षणीय स्थळांत आकर्षणाचे केंद्र बिंदू स्वामीनारायण मंदिर हे होते. हे एक भव्यदिव्य मंदिर असून, तेथे स्वामी नारायण, कृष्ण, विष्णू, लक्ष्मी आणि हनुमान या देवतांची स्थापना केली असून विद्यार्थ्यांनी मनोभावे दर्शन घेतले. संपूर्ण मंदिर परिसरात, भक्तीमय वातावरणात विद्यार्थी रममान झाले. सहलीत ८५ विद्यार्थ्यांनी व शिक्षक कर्मचारी वर्गांनी सहभाग घेतला. यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान वृध्दींगत होवून कल्पना शक्ती व आकलन शक्तीला वाव मिळाला. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास, सर्वांगीण विकास साधता यावा म्हणून तणावरहित व अनौपचारिक वातावरणा मध्ये मोठ्या उत्साहात एस टी बस मधून प्रेक्षणीय स्थळांना भेटी देवून विद्यार्थ्यांनी मनमूराद आनंद घेतला. सहल प्रमुख प्रा. नानाजी गजभिये यांनी सहलीचे नियोजन व व्यवस्थापन करून सहलीत संस्थेचे विश्वस्त हिरालाल गजभिये, मुख्याध्यापक नरेंद्र गणविर, सुनिल नागदिवे, निर्मला रंगारी, प्रा. दिनदयाल दमाहे, प्रा. अरुण कांबळे यांच्यामुळे शाळेची शैक्षणिक सहल अविस्मरणीय ठरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या