Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आर्वी (मराठी) नाटीका तालुक्यामधून प्रथम क्रमांक.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 वर्धा :-18 व 19 डिसेंबर 2025 पंचायत समिती आर्वी शिक्षण विभाग तालुकास्तरीय बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव राजीव गांधी स्टेडियम आर्वी येथे आयोजित केलेला होता,आर्वी येथे झालेली नाटिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आर्वी( मराठी )या नाटीकेमध्ये मामीचा जो रोल केलेला होता ती भूमिका असलेला विद्यार्थी आहे नाणेश्वर सुरेश उईके  वर्ग चौथा. या मुलाची भूमिका सर्वांना आवडली आणि या आनंदामध्ये आदरणीय सर्वांचे लाडके असलेले पंचायत समिती  शिक्षण विभाग आर्वी चे गटशिक्षणाधिकारी श्री पंकज तायडे साहेब , विस्तार अधिकारी साहेब आदरणीय श्री इंगोले, सौ. तायडे मॅडम , सौ.मानमोडे मॅडम,आदरणीय केंद्रप्रमुख साहेब श्री बोराडे  ,श्री लोणारे  ,श्री महाजन ,श्री तराळे ,.श्री कोहचाडे  सौ.कपले मॅडम यांनी या मामीला कवेमध्ये उचलून फोटो घेतलेला आहे. त्याचे कौतुक केलेले आहे आणि ही मामीची भूमिका सर्वांनाच आवडलीआणि परीक्षकांना सुद्धा ही नाटिका खुप आवडली , चांगल्या गुणांनी विजयी झालेले आहे. खुबगांव केंद्रामधून आर्वी( मराठी )ही केंद्रामधुन प्रथम क्रमांकावर शाळा आलेली आहे. तेव्हा गटशिक्षणाधिकारी साहेब तथा विस्तार अधिकारी साहेब तथा केंद्रप्रमुख साहेब आणि माझे सर्व  मुख्याध्यापक , शिक्षक ,शिक्षिका व सर्व विषय शिक्षक  व विशेष तंज्ञ शिक्षक  आणि पालक वर्ग तसेचं सर्व विद्यार्थी मित्रांचे  ! मनापासून आभार !
   या नाटीकाचे श्रेय जाते शाळेतील  मुख्याध्यापिका कु.प्राची राजकुमार राऊत यांना.सोबत सौ.रंजना नरेश उईके ( स.अ.) यांनी सहकार्य केले.
 सहभागी कलाकार.... नाणेश्वर उईके, सोहम टेकाम,पुरब भिलावे, प्रभास घरडे, तेजस मेश्राम, आकांशा  टेकाम ,मानसी बेंडे, चैताली चांदेकर, इत्यादी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या