चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : नागपूरच्या समाजसेविका तथा योगशिक्षिका मायाताई कोसरे व राजूरा येथील जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली काही वर्षांपासून सुरू असलेला महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप हा नवोदित तरुणींना प्रोत्साहन देणारा एकमेव गृप ठरल्याचे मत चंद्रपूर शहरातील शिवानी प्रमोद झाडे यांनी आज सोमवारी सायंकाळी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
रविवारी त्यांनी नवनियुक्त सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली .त्या नंतर आज त्यांनी आपलं सहज सुचलं विषयी मनोगत व्यक्त केले.सदरहु गृपमध्ये विदर्भातीलच नाही तर महाराष्ट्रातील अनेक जेष्ठ लेखिका, कवयित्री, रांगोळीकार, चित्रकार, मेकअप आर्टिस्ट या शिवाय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेक तरुणी व मधूर व गोड आवाजाच्या गायिका आहे.
या गृपचे एकंदर अठरा भाग आहे.त्यात मित्र परिवारचे
चार गृप आहे.
शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील अनेक सदस्य या सहज सुचलंला जुळल्या गेले आहे.
विशेष म्हणजे सहज सुचलं वरील ब-याच कर्तृत्ववान महिलांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बाबत विविध संस्थां व सामाजिक संघटनेकडून महिला कर्तृत्ववान सन्मान पुरस्कार बहाल झाले आहेत.
लोकहित सन्मान पुरस्कार प्राप्त मुल चिरोलीच्या पोर्णिमा किर्तीवार यांची कामगिरी बरीच उत्तम असल्याच्या त्या शेवटी म्हणाल्या.


0 टिप्पण्या