Ticker

6/recent/ticker-posts

गडचिरोली जिल्ह्यातील पहीले आदिवासी साहित्य कवी संमेलन



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई अनुदानित  वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले आयोजित गडचिरोली जिल्ह्यातील पहीले आदिवासी साहित्य संमेलन दिनांक 23 डिसेंबर 2025 ते 24 डिसेंबर 2025 या दोन दिवसीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले.यामध्ये दिनांक 24 डिसेंबर ला ठिक 9 वाजता युवा कविचे संमेलन आयोजित करण्यात आले त्यामध्ये या कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून चेतन ठाकरे होते. आणि उपस्थिती ईतर युवा कवी उपस्थिती होते. त्यामध्ये युवा कवी प्रेम जरपोतवार यांनी माय तुझ्या साठी, आचल चिकटे यांची माझी  माय, क्रांतिवीर सिडाम  यांची रावण, राखी ताजणे यांची ति थांबली नाही, ईषा पटकोटवार यांची आदिवासी अस्तित्व, पुर्वा कुंभारे  यांची आम्ही रानाचे पाखरू ,मिथुन मडावी,प्रांजली नैताम,अनिल कोवे आणि
 युवा कवी रुपेश पांडुरंग कुतरमारे यांची एक आदिवासी भावना व्यक्त करणारी मराठी कविता —जमीन, जंगल, वेदना आणि अस्मितेचा आवाज म्हणून 


                    *कविता*
-------------------------------------------

डोंगराच्या कुशीत जन्म माझा,
मातीच माझी ओळख झाली
शब्द आमचे बोलीत अडकले,
इतिहासात नावे कधीच नाही लिहिली.

जंगल आमचं देवस्थान,
नदी आमची आई
पण कागदावर सही पडली,
आणि हिरावली गेली सावली साई.

शहरांनी घेतली आमची जमीन,
घेतले स्वप्न, घेतले श्वास
आम्ही मात्र अजूनही उभे,
पायाखाली राख, डोळ्यात विश्वास.

शाळेच्या भिंती आम्हाला दूर,
पोटासाठी हातात कोयता
तरीही गीत जन्मतात रात्री,
तार्‍यांच्या प्रकाशात गातो आम्ही ओव्या.

कोणी नाही ऐकले आमचे दुःख,
नाही विचारला आमचा सवाल
पण माती सांगते प्रत्येक पावलावर,
आम्हीच आहोत या देशाचा पाया खाल.

आजही म्हणतो ठामपणे मी,
मी आदिवासी—माझा अभिमान
जे कोणी नाही म्हटले आजवर,
तोच माझ्या कवितेचा प्राण. 

या  विषयावर युवा कविनी त्यांचे मनोगत कविताच्या आधारे  व्यक्त केले या कार्यक्रमाला उपस्थित  संमेलनाध्यक्ष डॉ विनायक तुमराम,उदघाटक  पद्मश्री डॉ परशुराम खुणे प्रदीप ढवळ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई स्वागताध्यक्ष अब्दुल जमीर निमंत्रक प्राचार्य डॉ संजय फुलझेले सर आणि या सर्व संमेलनाचे संयोजक डॉ राजकुमार मुसणे आणि ज्येष्ठ साहित्यिक कुसुमताई आलम यांच्या मार्गदर्शकाने हा आदिवासी साहित्य संमेलन उत्तम रित्या पार पडले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या