Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामीण रुग्णालयातल प्रयोगशाळा सहाय्यिकेची बदली होऊनही दुसऱ्या जागा पाठविण्यास टाळाटाळ.


चित्रा न्युज  प्रतिनिधी
भद्रावती : येथील ग्रामीण रुग्णालयात  प्रयोगशाळा सहाय्यक पदावर महिला कर्मचारी गेल्या पाच वर्षापासून कार्यरत आहे. तिच्याकडे प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कामगिरी असल्याने ती आपल्या दोन वर्षाच्या लहान मुलिला घेवून कामगिरीवर कार्यरत आहे. मात्र हिची बदली होवून महिन्याभराचा कालावधी होवूनही तिला रिलिव्ह करण्यास टाळाटाळ केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

सदर प्रयोगशाळा सहाय्यक महिलेला दोन वर्षाची चिमुकली असून तिला सांभाळायला कुणी  नसल्याने मुलीला घेऊन यावं लागतात. हि महिला रुग्णालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. चिमुकलीचा सांभाळ करतांना मुलीच्या जिवाला धोका आहे. प्रयोगशाळेत विविध प्रकारचे रसायन असल्याने या चिमुकलीला कोणत्याही संसर्ग आजार होवू शकतात. यामुळे अशा धोक्याच्या ठिकाणी असलेल्या महिला व चिमुकलीला सुरक्षित ठिकाणी    कामगिरीवर ठेवणे आवश्यक आहे. तसेच तिच्या बदलीची ऑर्डर एक महिन्या अगोदरच निघाला असून अध्यापही तिला दुसऱ्या ठिकाणी पाठविण्यात आले नाही. हि शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या