भंडारा:-लोकशाही प्रक्रियेत सुशिक्षित मतदारांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने आयोजित भंडारा पदवीधर मतदार नोंदणी अभियान बैठकीला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या बैठकीत मार्गदर्शन करतांना आगामी काळात घराघरात जाऊन जनजागृती करणे, महाविद्यालयीन युवक-युवतींशी संपर्क साधणे तसेच ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमांचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आला. इतर निवडणुकीप्रमाणे पदवीधर निवडणूकही तितकीच गांभीर्याने घेऊन सर्वांनी तत्परतेने या अभियानात सक्रीय व्हावे, असे आवाहन डॉ.परिणय बुके यांनी केले.
यावेळी भंडारा नगरपरिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या विजयी उमेदवार सौ. मधुरा मिलिंद मदनकर यांच्यासह भाग्यश्री कलंबे, कुलप्रीत चड्ढा, चंद्रकला भोपे, शिवशंकर आजबले, रिता शैलेश मेश्राम, प्रिया खरोले, आशा ऊइके, निमिष डोकरीमारे, नितीन गायधने, वैशाली ब्राह्मणकर, आशा नेवारे, सचिन घनमारे, राजू व्यास, प्रिती ब्राह्मणकर, आशु गोंडाने, मंगेश वंजारी, प्रीति गाढवे, हाजी मुश्ताक ‘बल्ली’, अल्फीया अमीर शेख, हरिश्चंद्र मडावी, ललित जाम्भूलकर, भगवान बावनकर आणि ज्योती हरीश मोगरे या २३ नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांचा यथोचित सत्कार केला. शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


0 टिप्पण्या