Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा तालुकाध्यक्ष तथा पडसाळी गावचे सरपंच श्री. योगेश पाटील यांचेकडून सोलंकरवाडी जिल्हा परिषद शाळेस अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 25 हजारांची देणगी....

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :-सोलंकरवाडी ता माढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोलंकरवाडीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 25 हजार रुपयाची देणगी कै.  सुरेश बापू पाटील यांचे स्मरणार्थ तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांनी शाळेचे मुख्याध्यापक रामकृष्ण केदार सर व तत्कालीन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वामन भाऊ यादव यांच्याकडे 25 हजार रुपयांचा धनादेश देऊन सुपूर्द केला.
यावेळी बोलताना सरपंच योगेश पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या माध्यमातून जन सुविधा योजनेतून सोलंकरवाडी गावासाठी सोलंकरवाडी पडसाळी रस्त्यासाठी 8 लाख रुपये व पडसाळी सोलंकरवाडी शिवरस्ता 9 लाख रुपये मंजूर करून घेऊन सोलंकरवाडी गावच्या विकासात भर टाकली असल्याचे यावेळी सांगितले त्याचबरोबर भविष्यात पडसाळी गावाबरोबर सोलंकरवाडी गावच्या विकासासाठी जो जो शक्य होईल तितका निधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला मोडनिंब पंचक्रोशीतील ज्येष्ठ डॉक्टर अनिल गोळवलकर साहेब, डॉक्टर प्रशांत कोल्हे, डॉक्टर संतोष दळवी, रोटरीचे अध्यक्ष निलेश गिड्डे, रोटरीचे माजी अध्यक्ष औदुंबर पाटील, ज्योतीताई कुलकर्णी, निलेश पाटील, सोलंकरवाडी चे राजाभाऊ भांगिरे, अतुल माळी चेअरमन, माजी सरपंच अनंता गलांडे, संदीप गलांडे, अर्जुन भांगिरे, बाळासाहेब माळी, गोपाळ माळी, आजिनाथ शेंडगे, ताकतोडे साहेब यांच्यासह सोलंकरवाडी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचालन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष शहाजी बापू यादव यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या