जिल्हाधिकारी यांना निवेदन; ठेकेदार व अभियंत्यावर ५०० कोटी भ्रष्टाचाराचा आरोप!
चित्रा न्युज प्रतिनिधी
नंदूरबार :- ५७० कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नंदुरबार जिल्हा कारागृहाच्या बांधकामाचे स्टक्चरल ऑडीट,आर्थिक ऑडीट, करार ऑडीट, गुणवत्ता ऑडीट करा,भ्रष्टाचार करणा-या संबंधित बांधकाम अभियंता व ठेकेदारावर कायदेशीर कडक कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार डाॅ.मित्ताली सेठी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,नाशिक विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सन २०१४ मध्ये नंदुरबार जिल्हा कारागृह वर्ग १ चे उद्घाटन होऊन नवीन कारीगृह सुरू करण्यात आले.५७० कोटी रूपये खर्च करून हे कारागृह बांधण्यात आल्याचे माहिती मिळाली आहे.परंतू कारागृहाचे स्टक्चर व इतर गोष्टी बघून असे वाटते की,हे कारागृह बांधण्यासाठी जास्तीत जास्त ७० कोटी रूपये खर्च करण्यात आले असतील,बाकीचे ५०० कोटी रूपये हे ठेकेदार व संबंधित बांधकाम अभियंत्यांने भ्रष्टाचार करून गिळंकृत केल्याचे दिसून येते.कारण कारागृह बांधकाम होऊन केवळ ११ वर्षे पूर्ण झाली आहेत, तरी कारागृहाच्या भिंतींना भेगा पडून तळा पडले आहेत, छत- स्लॅब पावसाच्या पाण्याने गळत आहेत. आकार नसलेले अंडाकृती कारागृह बांधण्यात आलेले आहे.निष्कृष्ट बांधकाम केल्यामुळे कारागृहाचे बांधकाम टिकाऊ पणाचे नाही,त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.म्हणून कारागृहाची स्टक्चरल ऑडीट, आर्थिक ऑडीट, करार ऑडीट, गुणवत्ता ऑडीट होणे अत्यावश्यक आहे.नंदूरबार जिल्हा कारागृहातील बंद्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नंदुरबार जिल्हा कारागृह बांधकामाचे ऑडीट होणे अत्यंत गरजेचे आहे.तरी ५७० रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नंदुरबार जिल्हा कारागृहाचे ऑडीट करण्यात यावे व भ्रष्टाचार करणा-या संबंधित ठेकेदार व अभियंत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आलेली आहे.


0 टिप्पण्या