Ticker

6/recent/ticker-posts

माध्यमिक कन्या विद्यालयात राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती  :- कृषक सुधार मंडळ द्वारा संचलित माध्यमिक कन्या विद्यालय तळेगाव दशासर येथे दिनांक12 जानेवारीला
राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीदिनी बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार बालविवाह रोखण्याकरता गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली तसेच वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा घेण्यात आली .  विद्यालयामध्ये डॉ  बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी संघटना धामणगाव रेल्वे तर्फे संविधान जागृती निमित्त लेखी परीक्षा घेण्यात आली.
जयंती निमित्त विद्यार्थिनीं जिजाऊच्या वेशभूषा करून आल्यात.कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सौ सुप्रिया थोरात तर प्रमुख अतिथी  मुख्याध्यापिका सौ मंजुषा देशमुख मोहिनी देशमुख होत्या .कार्यक्रमाचे संचलन वर्ग 5 वी ची आंचल देवगडे आणि आभार स्वस्तिका गवळी हिने मानले. प्रास्ताविक प्रतिभा मॅडम यांनी केले. अध्यक्षीय भाषणात सौ  सुप्रिया थोरात यांनी विद्यार्थींनीना जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्यातील साधर्म्य समजाऊन सांगितले.कार्यक्रमाला पांडे मॅडम,पायल मॅडम, वैष्णवी  मॅडम, पोमेश थोरात,गजानन कावळे , लक्ष्मण पोटे सर्व विद्यार्थिनी  उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या