चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा : सावित्रीबाई फुले यांनी हळदी-कुंकू हा कार्यक्रम त्या काळातल्या परंपरागत धार्मिक विधी म्हणून नव्हे, तर स्त्रीजागृतीसाठीचे सामाजिक साधन म्हणून वापरला.
त्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडण्याची, बोलण्याची संधी नव्हती.
हळदी-कुंकूच्या निमित्ताने स्त्रिया एकत्र यायच्या. शिक्षण व जागृती
जमलेल्या स्त्रियांशी सावित्रीबाई शिक्षणाचे महत्त्व, स्वाभिमान, समानता यावर बोलायच्या.
अंधश्रद्धा, बालविवाह, केशवपन, विधवांवरील अन्याय याविषयी जागृती करायच्या. विधवा व शोषित स्त्रियांचा सन्मान त्या काळात विधवांना हळदी-कुंकूला बोलावले जात नव्हते.
सावित्रीबाईंनी विधवांना सन्मानाने सहभागी करून घेतले, त्यांना कुंकू लावले. परंपरेला नवे अर्थ देणे
हळदी-कुंकू फक्त “सौभाग्य” मर्यादित न ठेवता ते समता, माणुसकी आणि आत्मसन्मानाचे प्रतीक बनवले. सावित्रीबाईंनी हळदी-कुंकू स्त्रियांची मानसिक गुलामगिरी तोडण्यासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी वापरली. याच सावित्री बाईचे विचार घेत भंडारा जिल्हा ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने बेला येथील वृद्धाश्रमात जाऊन हळदी कुंकू लावून कार्यक्रम घेण्यात आले. वृद्धाश्रमात आपल्या जन्मलेल्या मुलांनी वाळीत टाकल्यासारक केलं. ज्या मुलाला आपल्या छातीच दूध पाजून आई कुठलीही परवा न करता मुलाबाळांना मोठ करते पण त्यांना वृद्धापकाळात गरज असताना त्यांना वाळीत टाकले जाते. असा महिलांचा सन्मान करून त्यांना हळदी कुंकू लावण्यात आलं....


0 टिप्पण्या