Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकारांनी आपल्या लेखननीतुन सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा -आमदार भीमराव केराम .


चित्रा न्युज प्रतिनिधी 
माहूर - दर्पण दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष माहुर तर्फे दिनांक 11जानेवारी 2026रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृहात किनवट माहुर विधानसभा मतदारसंघाचे विकासपुरुष आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकारांनी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखणीचा उपयोग करावा असे प्रतिपादन केले यावेळी व्यासपिठावर तालुका अध्यक्ष निळकंठ मस्के, शहराध्यक्ष गोपू महामुने,जिल्हा उपाध्यक्ष कांतराव घोडेकर भाजपा नेते ॲड.रमण जायभाये,जेष्ठ कार्यकर्ते विजय आमले,रुग्ण कल्याण समिती सदस्य अनिल वाघमारे,संजय राठोड, डॉ. निरंजन केशवे यांची उपस्थिती होती.
 कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर,यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच याप्पसंगी संत श्री संताजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी  बोलताना आमदार केराम म्हणाले की पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट प्रथा चालीरुढी तसेच आजुबाजुला घडणाऱ्या चांगल्या आणी वाइट घटनांची माहिती घेउन वृत्तपत्रांच्या माध्यमातून  शासनापर्य़त पोचवुन सर्वसामान्य जनतेवर होणऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याच काम अविरतपणे करीत आहेत हे करत असताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते तसेच समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागते त्यास न जुमानता पत्रकार आपले कार्य निष्ठेणे पार  पाडत आहेत.लोकशाहीला बळकटी देण्यासाठी पत्रकारांचे मोठे योगदान आहे,हि बाब निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.किरण वाघमारे यांची सहाय्यक उपसंचालक पदी नियुक्ती झाली त्याबद्दल आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते तसेच व्हाइस ऑफ मीडिया तालुका माहुर तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
 यावेळी भाजपाचे तालुका सरचिटणीस विनायक मुसळे,ज्येष्ठ कार्यकर्ते शामराव कुरमे,नागोराव सुर्वे, नारायणराव सुर्वे, विकास खरे,नंदु कोलपवार,मणिष राठोड,भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पवन चौहाण,गौरव जयस्वाल यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ कार्यकर्ते नंदकुमार जोशी यांनी केले तर सुरेख सुत्रसंचलन शेषेराव पाटील यांनी केले.तर शहराध्यक्ष गोपू महामुने यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या