Ticker

6/recent/ticker-posts

"आमचा गाव बेलगांव "मित्र समूहाच्या वतीने गुरुजनांचा सत्कार व स्नेहमिलन सोहळा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती :  दि.२५जानेवारी २०२६रोज रविवारला बेलगांव (भु) येथे "आमचा गाव बेलगांव" मित्र समूहाच्या वतने गुरुजनांचा सत्कार व स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न झाला.   
   
  बेलगांव मूळ निवासी परंतू व्यवसाय, नोकरी निमित्त शहरात स्थायिक झालेले सर्व मित्र व्हॉट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येऊन गावा विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम म्हणजे जन्मगावाशी नाळ पुन्हा जुळवणारी एक सुंदर संधी आणि गुरुजनांचा सत्कार करून  
ऋणमोचनाचा प्रयत्न म्हणून आयोजित करण्यात आला होता.
     सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विठ्ठलराव बोबडे, प्रमुख अतिथी सरपंच भारती सुनिल आगलावे, गुरुजन सत्कारमूर्ती आसेकर गुरुजी, बदकी गुरुजी, ताजने गुरुजी, चौधरी गुरुजी, ठावरी गुरुजी, दोडके गुरुजी, साखरकर गुरुजी आणि गुरुदेव सेवा मंडळ कार्यकर्ता योगेश वाभिटकर व डॉ. मनोहर ढवस उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमापूजना नंतर मित्र समूहातील एक मित्र स्व. चंद्रकांत भाऊराव पद्मावार यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली.
        प्रास्ताविका नंतर गुरुजनांचा सत्कार शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व मेडिकल काठी (भेटवस्तू) देऊन मित्रांच्या हस्ते करण्यात आला.
     सदर कार्यक्रमात सर्वजण परिचय देत असताना मनोगतातून गावविकास, आपल्या क्षमतांचा उपयोग व परस्पर सहकार्य या विषयांवर सविस्तर मत व्यक्त करून पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट करीत होते. गुरुजन सत्कारमूर्तीनी आपल्या मनोगतातून आपापल्या कारकीर्दीचा उल्लेख करीत जुन्या आठवणीना उजाळा देत मार्गदर्शन केले.
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश आसेकर, आभार प्रदर्शन देवराव झाडे तर सूत्र संचालन गजानन घुमे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता स्नेह भोजनाने झाली. काही मित्रांची कित्येक वर्षांनी भेट घडवून आणल्याने त्यांनी आयोजकांचे आभार मानले. शेवटी जड अंतःकरणाने सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी 'आमचा गाव बेलगाव ' मित्र समूहातील सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या