Ticker

6/recent/ticker-posts

नवनित विद्यालय खमारी (बुज.) येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :- दि. २६ जानेवारी २०२६ ला मोतीस्मृती ज्ञानजागृत बहुउद्देशीय शिक्षण संस्था पेट्रोलपंप (ठाणा) ता. जि. भंडारा व्दारा संचालित नवनित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खमारी (बुज.) ता. मोहाडी जि. भंडारा येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, वीरांगणा राणी अवंतीबाई, महात्मा गांधी, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक नरेंद्र गणविर व प्रमुखअतिथी यांनी पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. याप्रसंगी  मुख्याध्यापक नरेंद्र गणविर यांच्या हस्ते शाळेतील राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख उपस्थितीत सरपंच ओमप्रकाश दमाहे, उपसरपंच सुभाष दमाहे, सोविंदा माहूले अध्यक्ष तंटामुक्ती समिती, पोलिस पाटील कुवरसिंग दमाहे, एस. एल. लिल्हारे मुख्याध्यापक जि.प. पुर्व माध्य. शाळा खमारी (बुज.), लता उपराडे, उषा दमाहे, अल्का दमाहे, वंदना शहारे ग्रा.पं. सदस्या, जीवन दमाहे, राहुल तांडेकर ग्रा.पं. सदस्य, प्रमिला दमाहे, माधुरी क्षीरसागर, अल्का दमाहे अंगणवाडी सेविका, देवला दमाहे आशा वर्कर, गजलाल दमाहे, राधेश्याम गयगये, चेतन मसरके, संस्थेचे विश्वस्त हिरालाल गजभिये, नरेंद्र गणविर मुख्याध्यापक नवनित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खमारी (बुज.), सुनिल नागदिवे, निर्मला रंगारी, प्रा. दिनदयाल दमाहे, प्रा. अरुण कांबळे, प्रा. नाना गजभिये, अशोक गजभिये, अनिरुद्ध गजभिये, कैलास मेश्राम सह शाळेचे विद्यार्थी मोठया संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी गावातून प्रभातफेरी काढून प्रगती बिगर शेती ग्रामीण पतसंस्था, बस स्टॉप चौक, राणी अवंतीबाई चौक, परमात्मा एक भवन, ग्रामपंचायत कार्यालय खमारी (बुज.) येथील ध्वजारोहणास उपस्थिती दर्शविली. ग्रामपंचायत कार्यालयातील भव्य मैदानावर शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर कवायत, बैठे पीटी, लेझीम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाला खमारी (बुज.) या गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नानाजी गजभिये यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या