Ticker

6/recent/ticker-posts

प्रभात जाधव यांच्या किडणीच्या उपचाराकरिता दि भंडारा महिला नागरी पतसंस्थे तर्फे ११ हजाराची मदत


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-झबाडा (मानेगाव) येथील १५ वर्षीय प्रभात भगवान जाधव हा मुलगा दोन्ही किडण्याच्या त्रासाने त्रस्त आहे,आपल्या तुटक्या_फाटक्या झोपडीत हलाखीच्या परिस्थितीत त्यांचे आई _वडील मजुरी करून कसे बसे आपले जीवन कंठत आहेत.प्रभात मानेगाव येथे १० व्या वर्गात शिकत आहे,पण किडनीच्या आजारापायी तो चालता येत नसल्यामुळे त्यांचे वडील त्यास शाळेत सोडायला जात असतात. प्रभात च्या औषधोपचार करिता पैश्यांची खूप गरज आहे,प्रभात च्या मदतीकरिता सामाजिक कार्यकर्ता मो सईद शेख यांनी दी भंडारा महिला नागरी सहकारी पत संस्थेच्या अध्यक्षा सौ.दुर्गाताई डोरले यांच्या कडे निवेदन सादर केले होते.पश्चात पतसंस्थें च्या  सीएसआर( सामाजिक) निधीतून  ११ हजाराचे धनादेश  दि.भंडारा महिला नागरी सहकारी पत संस्थाध्यक्षा सौ.दुर्गाताई डोरले मॅडम यांचे हस्ते प्रभात च्या उपचारासाठी त्यांच्या वडिलांना सोपविण्यात आले.या प्रसंगी पतसंस्था चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रवीण साठवणे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री विवेक डोरले,सईद शेख ई उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या