चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :—गत २ निवडणुकीत विजय मिळवल्याने हवा आहे इं.काॅं.च्या पंजाची त्यात शिवसेना शिंदे गटानेही एंन्ट्री केल्याने चर्चा आहे ती धनुष्यबानाची.माञ गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असल्याने विजयी होणार "कमळ" असा सुर वाढवणा गटातील गावागावात ऐकू येत आहे.
उदगीर तालुक्यात वाढवणा या गटाकडे तालुक्यासह लातुरच्या देशमुखबंधूंचेही लक्ष लागले आहे.
कारण,१७ च्या निवडणुकी मध्ये तालुक्यात असलेल्या ७ पैकी या एकमेव गटात पंजा फडकला तर बाकी ६ गटात "कमळ" फुलले होते. म्हणजे भाजप जिंकला होता.म्हणुन वाढवणा हा गट इ.काॅं.पक्षाचा गड आहे. आणि यावेळेसही हा गड कायम ठेवण्यासाठी इं.काॅं. कडून होत असलेली धडपड,खटाटोप हवा करत आहे.तर यावेळी सत्ताधारी शिंदेसेनाही लढतीत असून तीही चर्चेत आली आहे.पण गत १० वर्षे ताब्यात असून सुध्दा इं.काॅं.च्या व्यक्तीने या गटाचा विशेष करुन स्व:ता च्या हाळी या गावचे किती *कल्याण* केले?हे पाहण्यासाठी मोठे भिंग असलेल्या चष्म्याची आणि दुर्बिणीची गरज आहे.असा सुर हाळीकरांतून निघतोय. लोकसेवक म्हणुन जिल्हा भरात ओळख असलेले जि.प.माजी उपाध्यक्ष राम भाऊ तिरुके,युथ आयकाॅन युवावर्गांचा ब्रॅंण्डअम्बेंसिडर असलेला विक्की भोसले व सौ.मनीषा मुंडकर यांचे "कमळ" यावेळेस या गट व गणात फुलणारचं. आणि "कमळ" फुलावे म्हणजेच भाजपचा विजय व्हावा,यासाठी यंदाची ही निवडणुक गटातील भाजपा व रा.काॅं.(अ.प) च्या हजारो कार्यकर्त्यांसह मतदारांनी हातात घेतल्याने यावेळेस इंदिरा काॅंग्रेसच्या गडाला भगदाड पाडून "कमळ" फुलवायचाच असा ठाम निर्धार मतदारांनी केला आहे.
आंबेडकरप्रेमी इं.काॅं.वर नाराज..
लातुर म.न.पा.मध्ये प्रकाशजी आंबेडकर यांची मदत घेऊन बहूमत मिळवलेल्या इं.काॅं.ने महापौर निवडीसाठी वंचितचा विचार केला नसल्याने जि.प.व पं.स.निवडणुकीत वंचितचा इं.काॅं.पक्षाला पाठींबा नाही. म्हणुन वंचितच्या कोणत्याही नेत्याचा फोटो इं.काॅं.पक्षाने प्रचार साहित्यावर लावूनये,असे वंचित आघाडीने जाहीर केले. तरीही इं.काॅं.च्या बॅनरवर प्रकाशची आंबेडकरांचा फोटो आहे.तो काढा असे सांगुनही काढला नसल्याने आंबेडकर प्रेमीबंधू-भगीणींमध्ये इं.काॅं. बद्दल तीव्र संताप,नाराजी आहे. हाळी व हंडरगुळी येथील वंचित आघाडी तसेच आंबेडकरप्रेमी मतदार वाढवणा गटात,गणात भाजप-रा.काॅं.युतीच्या तीनही उमेदवारांना बहूमताने विजयी करण्यासाठी मेहनत घेताना दिसतात.तर वंचितच्या नेत्यांचे फोटो इं.काॅं.च्या बॅनरवर दिसतात.



0 टिप्पण्या