चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा : समता विचार मंच इंदिरानगर सावरी / राजे दहेगाव द्वारा आयोजित, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जयंती महोत्सव, 10 जानेवारी, ते 12 जानेवारी 2026 पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कलाकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक - प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच गिरीश ठवकर, प्रमुख अतिथी म्हणून - जिल्हा परिषद सदस्य प्रेमदास वनवे, सामाजिक कार्यकर्ते मुकेश गजभिये, गोविंदा करंजेकर ( पोलीस पाटील ), डीडी बोरकर, धर्मपाल मेश्राम पत्रकार, शैलेश हुमणे पत्रकार भीमराव भवसागर, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करून कार्यक्रमा ची सुरुवात करण्यात आली. रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील पत्रकार भिमशाहिर प्रदीप बागवान कडबे यांना पुष्पगुच्छ संविधान प्रत देऊन त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक : समता विचार मंच इंदिरानगर सावरी, समाज बांधव गायक कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या