Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांगांसाठी रेल्वे सवलत कार्ड बनवणे झाले सोपे

दिव्यांगांसाठी रेल्वे सवलत कार्ड बनवणे झाले सोपे

आता घरबसल्या बनवा दिव्यांगांसाठी रेल्वे सवलत कार्ड 

दिव्यांग रेल्वे कार्ड 
दिव्यांग स्मार्ट कार्ड
(Divyangjan Photo ID Card) काढण्यासाठी आता रेल्वेने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे तुम्हाला वारंवार रेल्वे कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज पडत नाही.

ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे

१. अधिकृत संकेतस्थळ (Website)
तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत Divyangjan ID पोर्टलवरून अर्ज करू शकता:
 https://divyangjanid.indianrail.gov.in/
 
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

2. नवीन अर्जासाठी स्वतःची नोंदणी करा.

3. नवीन नोंदणीसाठी "New User" या पर्यायावर क्लिक करा.

4. आपले राज्य निवडा.

5. जवळचे रेल्वे स्थानक निवडा.

6. आधार क्रमांकाद्वारे सत्यापन करा.

7. अर्जदाराचे नाव भरा.

8. आधार क्रमांक टाका.

9. तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाका.

10. ईमेल आयडी लिहा आणि मोबाईल क्रमांक टाका.

11. मोबाईलवर आलेला OTP टाका.

12. अर्जदाराच्या अपंगत्वाचा प्रकार निवडा.

13. कॅप्चा भरून "Sign Up" करा.

14. त्यानंतर अर्जदार लॉगिन पेजवर जा.

15. मोबाईल क्रमांकासह लॉगिन करा.

16. "Apply for Concession Card" निवडा.

17. फॉर्म भरा आणि सवलत प्रमाणपत्र फोटो, दिव्यांग प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा अपलोड करा.

18. सवलत प्रमाणपत्र जारी करणाऱ्या शहराचे नाव निवडा.

19. प्रमाणपत्र जारी करणाऱ्या रुग्णालयाचे नाव लिहा.

20. प्रमाणपत्र जारी करणाऱ्या डॉक्टरांचे नाव लिहा.

21. डॉक्टरांच्या नोंदणी क्रमांकाची नोंद करा.

22. दिव्यांग प्रमाणपत्राचे शेवटचे 09 अंक टाका.

23. सेव्ह करा आणि सबमिट करा....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या