Ticker

6/recent/ticker-posts

स्कायवर्ड इंटरनॅशनल स्कूल येथे भव्य विज्ञान व आनंद मेळावा संपन्न

ग्रीन हाऊसद्वारे फळाची माहिती.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखनी(श.प्र.):- स्कायवर्ड इंटरनॅशनल स्कूल पिंपळगाव सडक येथे विज्ञान प्रदर्शनी तसेच आनंद मेळावा व ग्रीन हाऊस चे कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अमरदीप नंदेश्वर डीएचओ (क्षयरोग ) भंडारा, पिंपळगावचे सरपंच श्यामभाऊ शिवणकर, शाळेचे संचालक डॉ. पंकज कटकवार, डॉ नीरज कटकवार, अलका कटकवार, लीना एन. कटकवार, डॉ. विलास बुलकुंडे, डॉ. सोनाली काकडे या यांच्या हस्ते  शारदा मातेच्या प्रतिमेला मारल्यापर्ण  तसेच दीप प्रज्वलन करून सुरुवात  करण्यात आले.शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचे विज्ञान प्रयोग सादर केल्याने पालकांचे व पाहुण्यांचे लक्ष केंद्रित केले तसेच ग्रीन हाऊस च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी फळांविषयी व भाज्या विषयी माहिती दिली. फळांचे व भाज्यांचे महत्त्व सांगितले तसेच विविध फळांमध्ये व भाज्यांमधून मिळणाऱ्या जीवनसत्वा व खनिजा बद्दल माहिती दिली.विज्ञान प्रदर्शनी मध्ये मुलांनी विविध विषयानुरूप पोस्टर बनवले विषय होते राष्ट्रीय सुरक्षा वन हेल्थ वातावरणातील बदलाव असा जनजागृती संदेश मुलांनी चित्राच्या स्वरूपात मांडला तसेच विज्ञान प्रदर्शनी मध्ये विविध रेखीव रांगोळ्यांचा माध्यमातून जनजागृती संदेश दिला.विज्ञान प्रदर्शनी मध्ये मुलांनी विविध प्रकल्प सादर केले जसे थ्रीडी ऑर्गन प्रिंटर, वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम, चंद्रग्रहण व सूर्यग्रहण, रेन डिटेक्टर  अशा विविध विषयांवर मॉडल बनवले व उत्तमरीत्या मॉडेल्सच्या संकल्पना सर्वांना समजावून सांगितल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वर्णनांचे मूल्यांकन केले गेले.विज्ञान प्रदर्शनी सोबतच आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मुलांनी विविध प्रका�

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या