चित्रा न्युज प्रतिनिधी 
वसमत :-तालुक्यातील धानोरा येथे तिसरी धम्म परिषद साजरी करण्यात आली यावेळी भदंत पयाबोधि थेरो यांनी आपल्या प्रगतीचा आणि अधोगतीचा मार्ग स्वताच्याच हाती माणुस आपल्या आयुष्यातील अपयशासाठी किंवा दु.खासाठी अनेकदा दुसऱ्याला किंवा नशिबाला दोष देत असतो मात्र भगवान बुद्धांच्या शिकवणीनुसार कोणताही दुसरा व्यक्ती माणसाची अधोगती करु शकत नाही आणि कोणी त्याला जबरदस्तीने सदगतीलाही नेऊ शकत नाही अधोगती पुर्णतः आपल्याच कर्मावर अवलंबून असते पयाबोधि भंतेजी भगवान बुद्धांच्या विचारांचा दाखला देत म्हणाले की खुद्द बुद्ध सुद्धा स्वताला केवळ मार्गदाता मानतात मोक्षदाता नाही मी तुम्हाला मुक्त होण्याचा मार्ग दाखवु शकतो पण त्यामार्गावर चालण्याचे कष्ट तुम्हालाच घ्यावे लागतील पंचशीलाचे पालन दारु हत्या चोरी व्याभिचार आणि असत्य यापासून दूर राहणे केल्यास माणसाची प्रगती जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उपेक्षा भाव धारण करने हिच मानसिक शांतीची गुरुकिल्ली आहे स्वताला बदलणे हाच खरा धम्म धम्म हा केवळ ग्रंथ वाचण्यासाठी किंवा इतरांना उपदेश करण्यासाठी नसुन तो स्वतः मध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आहे आपल्या पायाला दगड लागल्यावर आपण दगडाला दोष देतो पण आपण जमिनीवर पाहुन चालत नाही हि आपली चूक कबूल करत नाही हा मानवी स्वभाव बदलुन अंतर्मुख होणे गरजेचे आहे बाह्य भौतिक सुखापेक्षा आध्यात्मिक सुख आणि मानसिक शांतता अधिक मोलाची आहे व्यसनापासून दुर राहण्याचे आवाहन केले यावेळी धम्म परिषदेच्या अध्यक्ष स्थानी भदंत महाविरो थेरो काळेगाव प्रमुख मार्गदर्शक भदंत पयाबोधि थेरो खुरगाव नांदेड भदंत पयानंद थेरो लातूर भंते सारीपुत भंते श्रद्धानंद आदि भिक्खूसंघ श्रामनेर धम्मपिठावर उपस्थित होते यावेळी सकाळी 9.30 वाजता सरपंच एंगडे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण केले त्यानंतर तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्त्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातुन धम्म मिरवणूक काढण्यात आली या धम्म मिरवणूकीत भिक्खू संघ श्रामनेर व शुभ्र वस्त्र परिधान करून उपासक उपासिका सहभाग घेऊन तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो असा जयघोष करीत धम्म रॅलीत सहभागी झाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार नागराज एंगडे यांनी केले या कार्यक्रमाला मधुकर मांजरमकर मुगोजी खंदारे सरपंच राजरत्न कुंटे बालाजी शिवभगत श्रीऱंग थोरात विजयकुमार एंगडे चंद्रमुनी मस्के बालाजी मस्के लिंबाजी मस्के अमोल मस्के पांडुरंग इंगळे विनोद एंगडे सुगत एंगडे घाटे गंगाप्रसाद मस्के सिद्धार्थ मस्के पांडुरंग एंगडे व गावातील व बाहेर गावातुन आलेले उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते