Ticker

6/recent/ticker-posts

बिरसा फायटर्सच्या आंदोलनाच्या इशा-यानंतर दरा फाटा ते म्हसावद रस्त्यावरील खड्डे बुजवले!

मी जेलमधून सुटल्यानंतर खड्डे बुजवायला सुरवात- सुशिलकुमार पावरा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
शहादा :-  शहादा तालुक्यातील दरा फाटा ते म्हसावद पर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून रस्ता दुरूस्त करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती.बिरसा फायटर्सने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला होता.त्यानंतर बांधकाम विभाग जागे झाले व या रस्त्यावरील खड्डे बुजवायला सुरवात केली आहे.रस्त्यावरील सर्वच खड्डे बुजवण्याचा आग्रह बिरसा फायटर्सने केला आहे. मी जेलमधून बाहेर सुटल्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरवात झालेली आहे.३ महिन्यांच्या कालावधीत कोणी लोकप्रतिनिधी व संघटनांनी या रस्त्यासाठी आवाज उठवला नाही.नागरिकांनी अशा कामांसाठी सतत जागृत राहायला पाहिजे,बिरसा फायटर्सचे काम असेच सातत्याने सुरूच राहील,अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.
                         शहादा ते धडगांव या मुख्य रस्त्यावरील दरा फाटा ते म्हसावद  या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.हा  रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. हा रस्ता अत्यंत खड्डेमय, धोकादायक झाला आहे. या रस्त्याचे काम करण्यात यावे,म्हणून बिरसा फायटर्स संघटनेकडून आंदोलन सुद्धा करण्यात आले होते.त्यानंतर रस्ता दुरूस्त करण्यात आला होता.परंतू पुन्हा रस्त्यावर मोठ -मोठे खड्डे पडले आहेत. 
                          सदर रस्ता हा  धडगांव ते शहादा या दोन तालुक्यांना जोडणारा एकमेव मार्ग असल्याकारणाने वाहनांची मोठी वर्दळ असते.या रस्त्यावरून कायमच्याच एस टी महामंडळाच्या बस ये जा करतात. ठेकेदार व बांधकाम विभागाने केलेल्या भ्रष्टाचारामुळे  या रस्त्याचे बारा वाजले आहेत.रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्यांची भयानक अवस्था  आहे.रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांमध्ये व प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे.रस्त्यावर ५  फूट पेक्षा अधिक खोल खड्डे झाले आहेत. या रस्त्यावरून गरोदर महिला,वयस्कर व आजारी नागरिकांना प्रवास नको झाले असून प्रवाशी हैराण झाले आहेत. वाहन चालवतांना खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होत असून दुखापत होत आहे. या रस्त्यावरून प्रवास करतांना प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतात म्हणून तातडीने या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून रस्ता दुरूस्त करण्यात यावा,अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.अशी मागणी करण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या