Ticker

6/recent/ticker-posts

महाविकास आघाडी व मित्रपक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारी अर्ज उत्साहात दाखल

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :- माळशिरस तहसील कार्यालय येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ निमित्त महाविकास आघाडी व मित्रपक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारी अर्ज उत्साहात दाखल करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शक सहकार महर्षी साखर कारखाना चे चेअरमन आदरणीय श्री. जयसिंह (बाळदादा) मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय श्री. मदनसिंह मोहिते-पाटील, माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय श्री. धैर्यशील मोहिते-पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार आदरणीय श्री. उत्तमराव जानकर आणि अकलूज नगरपरिषद चे नवनिर्वाचित नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व अधिकृत उमेदवार आणि माळशिरस तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांच्या जनसमुदायात हा उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम पार पडला.
 अर्जुनसिंह मोहिते पाटील साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने (चिन्ह: तुतारी वाजवणारा माणूस) फोंडशिरस जिल्हा परिषद गट व गुरसाळे पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केला  सौ. वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी  यशवंतनगर पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केला  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार, शिवसेना ( शिंदे गट धनुष्यबाण ), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट,आर पी आय आठवले गट या सर्व मित्र पक्षानी शक्ती प्रदर्शन करित उमेदवारी अर्ज दाखल केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या