Ticker

6/recent/ticker-posts

मरणालाही अर्थ देणारा विचारवंत स्व.ॲड राम विद्या भागवतराव बुरंगे

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 अमरावती  :-  'मरावे परी र्कीर्ती रुपे उरावी ' या संत वचनाप्रमाणे माणसांच्या गर्दीतीतील काही माणसं ही न आवडणाऱ्या समाज व्यवस्थेला छेद देवून समाजाच्या विकासासाठी पहिलं पाऊल ठेवतात. स्वतःचे आयुष्य कोणत्याही एका ओळखीपुरते मर्यादित न ठेवता नेहमी प्रश्न विचारतात. मानवतेचं उत्कट आणि निस्सीमपणाचा स्वकर्तृत्वाचा दाखला देतात ती माणसं मृत्यूनंतरही आपल्या सेवावृत्तीने अमर राहतात. त्यांचे प्रत्येक पाऊल 'प्रत्येक कृती ' प्रत्येक निर्णय हा मानवी समाजासाठी दीपस्तंभ बनतो. आणि ह्याच सेवाभावी मांडियाळीतील अत्यंत देखणं ' ज्ञानी 'कर्तृत्वान 'परोपकारी ' संवेदन ' सौजन्यशील मन ' स्व. ॲड.राम विद्या भागवतराव बुरंगे.
     अमरावती शहरातील अंबागेटच्या आंत आपल्या परोपकारीवृत्ती ' नीतीमुल्यांनी मानवी समाज मनावर सहज प्रतिबिंबीत असणारे दातृत्वशील ' कुटुंबवत्सल'बुरंगे परिवार. अमाप सुख - समृद्धी - वैभववाडीत ' वाढलेला राम हा सेवाव्रती माजी मुख्याध्यापिका स्व. विद्याताई भागवतराव बुरंगे यांचा लहानगा .लहानपणा पासूनच कुटुंबातील सेवेचे संस्कार 'विंचू दंश उतरवून रोग्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे , गोरगरीब 'अनाथांचा आधार देणे ' एखाद्या गरजू व्यक्तीला तन ' मन 'धनाने सर्वतोपरी मदत करुन त्या व्यक्तिला मरण्याच्या दाढेतून वाचविणे ,आजच्या घडीला न दिसणारा हा संस्कार ' ही बुरंगे परिवाराची जीवनशैली आदरातिथ्य अतिथी देवो भव:। आजही दिसून येते. आणि हाच बुरंगे परिवाराचा जीवनस्तंभ आहे.राम 'तू जीवनशैलीचा भाग तू आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंतच नव्हे तर मरणानंतर सुद्धा जपलांत. तुझ्या जाण्याची अशुभ वार्ता घेवून आलेला
    4 जाने. हा दिवस आमच्यासाठी काळाकुट्ट दिवस ठरला . आयुष्याचे अवघे 55 वर्ष जगलांत पण जगणं कमालीचं प्रेरणा देवून गेलात. ' लोकांचं जीवं वाचविणारा 'रक्तदाता ' आई -नानाची ' कुटुंबातील थोरांची सेवा करणारा 'श्रावण बाळ ' तुझ्या सर्व बहिणींच्या सुखाकरिता जबाबदारी घेतलेला तू श्रीकृष्ण होतास.' पत्नी संगीता ही शिक्षिका आहे तिचा कटाक्षाने सन्मान जपणारा ' सुरक्षा कवच' . संगीताचा खरा राम होतास . तूझ्या जाण्या नंतर तिने रडत बसण्यापेक्षा मुलींना घडविण्याचं बळ देऊन गेलास.तू तुझ्या गुणी दोन्ही कन्यांच्या उच्च शिक्षणासाठी घेतलेला ध्यासातून घडलेली गुणी मोठी कन्या कु. गौरी राम बुरंगे हिने 'संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून ' First prize colour Holder ठरली. हे मुलीच्या उत्तुंग ज्ञानी ' गुणवत्तेचे सादरीकरण नव्हते तर तो तुझ्या सकारात्मक उर्जेने समाजाला ठणकावून सांगणारा मौलिक संदेश होता की, मुलींवर विश्वास ठेवा .त्यांनाही उच्च विद्याविभूषित ' होण्याची सुवर्ण संधी द्या. त्या निश्चितच ज्ञानाने आकाशाला ही गवसणी घालू शकणारे यश प्राप्ती करू शकतात. हा संदेशाला गौरीने अर्थ दिलात . पण पोरींचे कौतूक ' गुणगान करायला तू नाहीस पण ' मुलींनी तुझ्या उत्तुंग ज्ञानी असण्याचे फलित समाजाला दिलेत. तुला प्रत्येकवेळी तुझ्या जगण्याला बळं मिळावे म्हणून संजूदादा ' नितीनदादा 'रवीदादा प्रकाशदादा ' आशिष ' तुझी ताई मंजू , सारीका यांची प्रबळ साथ दिली. ' क्रूर नियतीने तुझ्या जगण्यामृत्यूच्या क्षणी आपला डाव साधला अन् आपल्या क्रूर बहूपाशात कायमचे सामावून घेतलेत. राम तुझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मृत्यूशी झुंजतांना 'मानवतेचा उत्कृष्ट निस्सीम सेवा पत्नी संगीताने क्षणोक्षणी केली. पोरींची प्रार्थना हे सिद्धश्वरा ! आमच्यावर नितांत माया ' ममत्वाचं सिंचन करणाऱ्या आमच्या प्रिय' बाबाला यमदूता पासून सोडवण्याची आर्त प्रार्थना क्रूर नियतीने देवापर्यंत पोहचू दिली नाही . शेवटी 'कवी सुरेष भटांच्या 'मरणाने केली सुटका ' जगण्याने छळले होते या ओळी तुझ्या आयुष्याशी जुळल्यात. 
समाजसेवा ' रक्तदान ' औषधोपचार 'आर्थिक मदत ' सहस्त्र वक्ता दशसहस्त्रेषु ' ज्ञान करणे हे तुझ्या निस्वार्थ कर्माचे प्रतिक होत ' सामाजिक उत्तरदायित्व होत. ॲड.राम भागवतराव बुरंगे म्हणजे माझा अभिमान होता .माझा भक्कम आधार होता . माझं शहाणपण होतं. तू न्यायाच्या प्रक्रियेत फक्तच कायद्याचे पालन केले नाहीस तर ' अडचणीत आणल्या गेलेल्यांना ' दुर्बल आणि गोरगरिबांना त्यांचा आधार बनून न्याय मिळवून देणारा निस्वार्थतेचे प्रतिक होतास.राम ' तू गेला कसं म्हणावं की ' आज समाजामध्ये मृत्यूलाही भीती आणि अंधश्रध्देचे कोंदण असतांना त्या कोंदणाला सकारात्मक विचारांनी अलगद बाजूला ठेवून माझा देह संपल्या नंतर कुणाचं तरी आयुष्य उजळू दे ' हा विचार केवळ देहदानापुरताच नव्हे तर ' विचारांच्या सन्मानाची स्वतः साक्ष दिलीत.ज्याने देहदान वैद्यकीय प्रयोग शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या हातांना कौशल्य , डोळ्यांना शिस्त आणि मनाला संवेदना जागृत व्हाव्यात आणि यातून सक्षम डॉक्टर्स तयार होवून तो गोरगरिबांचा 'देवदूत ' व्हावा. ह्या उदात्त ' तळमळीची भावनेने मृत्यूलाही राम तू अर्थ दिलास.
     राम तू आज आमच्यात नाहीस हे जरी वास्तव आहे पण तू दिलेल्या विचारांचा ' जपलेल्या मूल्याचे प्रतिबिंब अमरच राहील . कारण तू मृत्यूलाही अर्थ दिलात. तू कायम तुझ्या अर्थपूर्ण जगण्याने कायम मानवी समाजावर ठसा उमटविलात . . . तो कधीही न पुसण्यासाठी .
जगता जगता मूल्यांचा भार तू उचललास ..
मरतांना देह ही देवून गेलास ...
सुटका मृत्युने केली खरी . . .
छळ तुझा जगण्याने झाला . . .
' पराधीन आहे जगती।
पुत्र मानवाचा । दोष ना कुणाचा।
राम तू अमर झालास । प्रेरणा देवून गेलास ।
जेथे आहे तेथे सुखी रहा ।
याशिवाय काय मागावे देवा तुला । तेरवी निमित्य तुझ्या मृत्यांस चिरशांती लाभावी । करिता
शब्दप्रपंच* ।
शोकाकूल
दादा ' तुझी ताई मंजू '
पत्नी संगीता
सुकन्या गौरी विभा
समस्त बुरंगे परिवार*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या