Ticker

6/recent/ticker-posts

तांबवे गावात सर्वधर्म समभावाचे प्रेरणादायी दर्शन.

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :-तांबवे गावात सामाजिक एकोपा आणि धार्मिक सलोख्याचे अत्यंत प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले.गावातील मंदिर आणि मस्जिद मध्ये केवळ 15 ते 20 फुटांचे अंतर आहे .मंदिर आणि मस्जिद मध्ये ही आणि वेगवेगळ्या धर्माच्या लोकांमध्येही धार्मिक अंतर  दिसत नसून सर्व धर्म समभाव आणि एकात्मता गावात दिसून येते .गावातील मुस्लिम समाजाने पुढाकार घेत हरिनाम सप्ताहामध्ये भाग घेऊन सर्वधर्म समभावाचा आदर्श घालून दिला.
या हरिनाम सप्ताहात गावातील सर्व समाजघटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भजन, कीर्तन आणि नामस्मरणाच्या वातावरणात गावात भक्तीबरोबरच आपुलकीची भावना अधिक दृढ झाली. विशेष बाब म्हणजे मागच्या सोळा वर्षांपासून गावात हरिनाम सप्ताह चालू आहे.प्रत्येक वर्षी सप्ताहातील एका दिवशी मुस्लिम समाजाच्या वतीने किर्तन व प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.यंदा पुणे राजगुरुनगर येथील झी मराठी फेम समाज प्रबोधनकार  ह.भ.प वैभव गावडे महाराज यांना कृषी अधिकारी ( बँक ऑफ इंडिया रिटायर्ड अकलूज शाखा )फकृद्दिनअहमद शेख साहेब यांनी  
रोख रक्कम व शाल श्रीफळ देवून सन्मानित केले तर प्राचार्यअबूबक्कर महमंद शेख साहेब  एक दिवसीय महाप्रसादाची संपूर्ण जवाबदारी उचलली . हिंदू–मुस्लिमसह सर्व समाजातील नागरिकांनी कोणताही भेदभाव न ठेवता सहभाग घेतला. प्रेम, माणुसकी आणि बंधुभावाच्या भावनेतून दिलेला हा महाप्रसाद सामाजिक ऐक्याचा जिवंत संदेश ठरला.
धर्म, जात, पंथ यांच्या पलीकडे जाऊन तांबवे गावाने एकतेचा आणि शांततेचा आदर्श निर्माण केला असून, हा उपक्रम आजच्या काळात समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एहसान कृषी सेवा  केंद्राचे/  युवा उद्योजक एजाज शेख (A S M पुणे सोलापूर एरिया सेल्स मॅनेजर ) क्रिएशन पेस्टिसाइड सतीश कोळेकर माजी उपसरपंच, मुस्लिम धर्मगुरू जिलानी शेख, लतीफ शेख, कानिफ लवटे, मोनम शेख ,असिफ अली शेख ,दशरथ लवटे,सलीम खान,अस्लम मुलाणी, शब्बीर मुल्ला, जब्बार शेख, अब्दुल गणी शेख, तसेच तांबवे गावचे  युवा वारकरी रत्न  ह भ प भूषण घाडगे महाराज यांनी प्रवचन केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या