Ticker

6/recent/ticker-posts

औरंगाबादमध्ये 'वंचित'ची लाट; सुजात आंबेडकरांच्या सभेला जयभीम नगरात तुफान गर्दी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
औरंगाबाद : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने शहरात आपला जोर वाढवला असून, युवा नेते सुजात आंबेडकर यांनी प्रभाग क्रमांक ५ मध्ये प्रचाराचा धडाका लावला आहे. जयभीम नगर आणि गरमपाणी परिसरात काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने आणि त्यानंतर झालेल्या जाहीर सभेने 'वंचित'चे शक्तीप्रदर्शन घडवून आणले.

जयभीम नगरमध्ये 'वंचित'चा जयघोष

प्रभाग क्रमांक ५ मधील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वर्षा रतन जाधव आणि श्याम बाबूराव भारसाखळे यांच्या प्रचारार्थ ही रॅली काढण्यात आली होती.
रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी सुजात आंबेडकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
निळ्या रंगाच्या झेंड्यांनी आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

सुजात आंबेडकरांचे परिवर्तनाचे आवाहन

रॅलीचे रूपांतर एका भव्य जाहीर सभेत झाले. यावेळी मतदारांशी संवाद साधताना सुजात आंबेडकर म्हणाले, "जयभीम नगर आणि गरमपाणी भागातील जनतेने नेहमीच परिवर्तनाची साथ दिली आहे. स्थानिक समस्या सोडवण्यासाठी आणि महापालिकेत वंचितांचा बुलंद आवाज पोहोचवण्यासाठी वर्षा जाधव आणि श्याम भारसाखळे या सक्षम उमेदवारांना बहुमताने विजयी करा."

मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या रॅलीत तरुणांचा मोठा सहभाग दिसून आला. तसेच मोठ्या संख्येने नागरिकांची तुफान गर्दी होत असून संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या