चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी:—होऊ घातलेल्या जि.प.पं.स निवडणुकीच्या संदर्भात प्रचार कार्याचे उद्घाटन आ. संजयभाऊ बनसोडे यांच्या हस्ते वाढवणा बू.येथे दि.२३ रोजी करण्यात आले.
यावेळी गटातील सर्वधर्मीय हजारो मतदार उपस्थित होते.
वाढवणा गटातील भाजपा- रा.काॅं.युतीचे उमेदवार श्री. रामभाऊ तिरुके यांनी आज पर्यंत सर्वसामान्य घरातील अतिगंभीर रुग्णांचे मुंबई - पुणे या महानगरात मोफत शस्ञक्रिया तथा उपचार केले असल्याने जवळपास चार हजार रुग्णांना नवीन जीवन मिळाले आहे.तसेच ते जि.प.उपाध्यक्ष असताना सबंध जिल्ह्यात विकासाचे मोठे कामे केले असून या निवडणुकीत ही रामभाऊ तिरुकेंसह वाढोना गणातील उमेदवार सौ.मुंडकर तसेच हंडरगुळीगणातील उमेदवार विक्की भोसले-पाटील यांना प्रचंड बहूमताने विजयी करा,असे आवाहन आ.संजयभाऊ बनसोडेंनी उपस्थितांना केले.
मला बाहेरचा उमेदवार म्हणणा-या इं.काॅं.पक्षाच्या लोकांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत इं. काॅं.पक्षाने लातुरला उभा केलेला उमेदवार हा प्राॅपर लातुरचा होता का?याचे उत्तर द्यावे.तसेच वाढवणा गटातील माय-बाप जनतेनी आम्हा तीन ही उमेदवारांना मतदान रुपी कर्ज द्यावे.त्या मतदान रुपी कर्जाची फेड विकास कामे करुन करणार आहे.असे रामभाऊ तिरुके म्हणाले.
यावेळी राजेश्वर निटुरे माजी नगराध्यक्ष,श्याम डावळे सदस्य जि.नियोजन समिती यांनीही सविस्तर असे मनोगत व्यक्त केले.यावेळी हजारो मतदार विशेष करुन महिलावर्ग मोठ्या संख्येनी उपस्थित होता.सुञसंचलन बबन भांगे यांनी केले.
गत १० वर्षे हा गट इं.काॅं. च्या ताब्यात होता.तेंव्हा गत १० वर्षात खरे *कल्याण* कुणाचे झाले?अशी चर्चा वाढवणा गटात सुरु आहे.


0 टिप्पण्या