Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवंग येथे सजला बाल आनंदी बाजार

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर:-चार भिंतींआड पुस्तकातील ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान मिळावे म्हणून शाळेच्या प्रांगणात ६५ बालकांनी दुकाने मांडली. त्यावर स्वत:च्याच शेतातून आणलेल्या पालेभाज्या, फळे विक्रीसाठी आणून ठेवली होती. या बाल आनंद बाजारात खरेदीसाठी पालकांसह ग्रामस्थांनी गर्दी केली होती.


लवंग ता. माळशिरस  येथील जिल्हा परिषद शाळा लवंग यांच्या वतीने  बाल आनंद बाजाराचे आयोजन जिल्हा परिषद शाळा प्रांगणात करण्यात आले होते. मुलांना शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळावे, यासाठी आयोजित या उपक्रमात  शाळांतील सुमारे ६५ बाल व्यावसायिक सहभागी झाले होते. या आनंद बाजारात ४५ हजार रुपयांची उलाढाल झाली. या बाजारात पालकांसह ग्रामस्थांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. प्रारंभी शाळा समितीचे अध्यक्ष प्रवीण वाघ  यांच्या हस्ते या आनंद बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.  
आनंदी बाजार निमित्ताने हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला. 

 आनंदी बाजार यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका सौ. संगीता भोंग मॅडम, सौ.शुभांगी हिरवे, श्री. करीम कोरबू सर, श्री. जावेद मुलांनी  यांनी परिश्रम घेतले. सर्व पालक वर्गाने आपल्या पाल्यांना विविध स्टॉल उपलब्ध करून प्रोत्साहन दिले.

या आनंद बाजारात शेतात पिकणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या, फळे, गावरान मेवा, चहा, कॉफी, शीतपेये, वडापाव, पाणीपुरी, शैक्षणिक साहित्य, खेळणी-फुगे, स्टेशनरी, ज्वेलरी आदींची दुकाने थाटली होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या