Ticker

6/recent/ticker-posts

वाढवणा गटात भाजपा आघाडीवरहाळी-हंडरगुळीत मतदार बंधू-भगीणींचा प्रतिसाद

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी:—होऊ घातलेल्या जि.प.पं.स निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून लातुर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात भाजपा व रा.काॅं पक्षाची युती झाली आहे.व वाढवणा हा गट भाजपला सुटल्याने जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके हे जि.प.साठी तर वाढवणा गणातुन सौ.मनिषा मुंडकर आणि हंडरगुळी गणामधून विक्की भोसले-पाटील हे नशीब अजमावत आहेत.
यानिवडणुकीच्या निमित्ताने दि.२२ रोजी राञी उमेदवार रामभाऊ तिरुके व विक्की भोसले यांनी हाळीहंडरगुळी येथील व्यापारीबांधवांसह मतदारांची सदिच्छा भेट घेतली आणि आपला परिचय करुन दिला असता हाळीहंडरगुळीकरांनी मोठे मताधिक्य देण्याचा शब्द उमेदवारांना आणि प्रतिसाद दिला आहे..
गटातील वाढवणा नंतर सर्वात जास्त मतदार हाळी व हंडरगुळीत असल्याने व हे २ गावं तर भाजपला पक्के भाजपाई असल्याने उमेदवारांसह उपस्थित सर्व कार्यकर्त्यांच्या चेह-यावर आनंद दिसत होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या