चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर :-महिलांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे तसेच सामाजिक प्रबोधन घडावे या उद्देशाने दि. ८ फेब्रुवारी 2026 ला 'संवाद प्रतिष्ठान' तर्फे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे 'हिरकणी सांस्कृतिक महोत्सव' चे आयोजन करण्यात आले होते.
या भव्य-दिव्य अशा सांस्कृतिक महोत्सवाला उद्घ़ाटिका मान. प्रतिभा ताई धानोरकर (खासदार चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र ), महोत्सवाचे अध्यक्ष मान. चंद्रकांत वासाडे (अध्यक्ष संवाद प्रतिष्ठान), प्रमुख अतिथी मान. देवराव भोंगळे (आमदार राजूरा विधानसभा क्षेत्र), मान. प्रा. विजय बदखल ( सचिव संवाद प्रतिष्ठान), मान. किसन नागरकर (समन्वयक हिरकणी सांस्कृतिक महोत्सव), मान. सुनील कुंभे, मान. अमित येरगुडे, मान. संजय ढवस, उत्तम डाखरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या महोत्सवात विशेष आकर्षण ठरली ती 'चंद्रा' लावणी. नागपूरच्या गायिका पल्लवी नगराळे यांनी 'चंद्रा' लावणी सादर करून आपल्या मधुर आवाजाने सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले तर काहींना ताल धरायला भाग पाडले. विशेष म्हणजे महाराष्ट्रीयन मराठमोळ्या वेषभूषे मध्ये गायिकेने या लावणीचे सादरीकरण केले.
भारतीय संस्कृती, परंपरा, तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर आधारित कौटुंबिक व सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले होते. यामध्ये ग्रुप डान्स, गीतगायन, मिमिक्री, फॅशन शो अशा विविध कलाप्रकारांतून प्रस्तुती करण्यात आली. याचप्रसंगी संवाद प्रतिष्ठान तर्फे विदर्भातील ५ गुणवंत महिलांची निवड करून त्यांना महाराष्ट्रस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या भव्य-दिव्य अशा सांस्कृतिक महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सायली ताई देठे, मनीषा ताई आवारी, शिल्पा ताई सूर, अर्चना ताई सातपुते, ज्योत्स्ना ताई उरकुडे, आरती ताई येरगुडे, सारिका ताई कुचनकर, साक्षी ताई डुकरे, प्रणाली ताई घुगुल, अंकिता ताई कातकर, दिव्यांनी ताई उपरे, किसनजी नागरकर, प्रमोदजी उरकुडे, महेशजी गुंजेकर, हितेशजी गोहोकार आदींनी परिश्रम घेतले.



0 टिप्पण्या