Ticker

6/recent/ticker-posts

गोंडेगाव येथे पारंपारिक लोक कलेचा कार्यक्रम संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखनी:-तालुक्यातील गोंडेगाव येथे विदर्भ शाहीर कलाकार परिषद शाखा भंडारा व स्व.सुलोचना पारधीकर बहुउद्देशीय संस्था मासलमेटा संयुक्त विद्यमाने स्व.मोतीराम धर्माजी बोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दोन दिवसीय जिल्हा स्तरीय सांस्कृतिक कला महोत्सव "पारंपारिक लोक कलेचा"ह्या कार्यक्रम दि.७ व८ फेब्रुवारी २०२६ रोज शनिवार व रविवारला मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे द्विपप्रज्वलन भंडारा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा.प्रा.होमराज कापगते यांनी केले, कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार मा.डाॅ.प्रशांत पडोळे यांच्या हस्ते,तर कार्यक्रमाचे अध्यक्ष भंडारा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मा.सुनिलभाऊ फुंडे लाभले.विशेष अतिथी म्हणून मध्यवर्ती बँकेचे संचालक मा.प्रदिप बुराडे, मध्यवर्ती बँकेचे संचालक मा.डाॅ.श्रीकांतजी वैरागडे,माजी जिल्हा परिषद सदस्य मा.राजेशजी बांते,माजी जि.प.उपाध्यक्ष मा.नरेशजी माहेश्वरी, कृ.उ.बा.स.संचालक मा.रामकृष्ण वाढई,पंचायत समिती सभापती सौ.अश्विनी मोहतुरे,माजी सरपंच मा.पांडूरंग बोरकर, विदर्भ शा.क.परिषदेचे जिल्हाध्यक्ष मा.डाॅ.रामनाथ पारधीकर, महाराष्ट्र कोषाध्यक्ष मा.मिलींद खोब्रागडे, मानधन निवड समिती सदस्या सौ.ज्योतीताई वाघाये, वंदना पारधीकर, मा.राजेश ईसापुरे,साकोलीचे तालुकाध्यक्ष मा.राजेंद्र येळे, लाखनी तालुकाध्यक्ष मा.केशव फसाटे, भंडारा तालुकाध्यक्ष मा.धनराज नखाते, नरेंद्र चौधरी,रमेश रामटेके, नंदा बाबरे, विश्वनाथ जगनाडे, नेमीचंद फंदे, धनराज पारधीकर, अर्चना पुंडे, मा.युगेश्वरी बोरकर माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
           मा.होमराज कापगते यांनी कलावंतांना मार्गदर्शन करताना संघटना म्हणजे काय?यांवर विश्लेषण करून उपस्थितांना मार्गदर्शन केले व कलावंतांच्या अडी- अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले.मा.डाॅ.प्रशांत पडोळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कलावंत आणि शेतकरी यांच्या कोणत्याही अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी मी वेळोवेळी प्रयत्नशील आहे.आपल्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे व कलावंतांनी आपली कला अविरत चालू ठेवून तिला वृद्धिंगत करावं.मा.सुनिलभाऊ फुंडे यांनी मार्गदर्शन करतानी सांगितले की,कला हि जन्मतः प्रत्येक मणुष्यामध्ये आहे पण तिला वृद्धिंगत करण्याचा हेतू समोर ठेवून तिला वृद्धिंगत करावं, पारंपारिक लोक कला लुप्त होत आहेत त्या कलमांना पुन्हा जिवंत करून सादरीकरण करण्यात यावं असे अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले.या सांस्कृतिक कला महोत्सवात विदर्भातील भंडारा , गोंदिया,चंद्रपुर, गडचिरोली, नागपूर येथील कलाकार उपस्थित झाले.महोत्सवात दंडार, गोंधळ,डहाका, खडी गंमत, वारकरी दिंडी, हरिपाठ, जात्यावरचे गाणे,रोवण्याचे गाणे,कोळी नृत्य,लावणी, पांगुळ, वासुदेव,गोरक्षनाथ(किंदरी), पोळ्याच्या झडती,किर्तन,भजन, लेझीम नृत्य, एकपात्री नाटक, इत्यादी लोप पावणाऱ्या कलांचे सादरीकरण करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भास्कर कमाने,खुलेश्वर चवळे,माया गुरनुले,कुंताफसाटे,रंजना येळे,शोभा बिसने,लोटन पटले, रमेश तिडके,देवचंद येळेकर,केशोराव चांदेवार,प्रेमराज गोटेफोडे, यशवंत राऊत,नरेश बिसने,देवागना पटले,स्मिता बिसने,कोमल झोडे आदिनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक सरपंच तथा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा.धर्मेद्र बोरकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार विदर्भ शाहिर कलाकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ.रामनाथ पारधीकर यांनी मानले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन मा.मिलींद खोब्रागडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या