चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा : मोहाडी तालुक्यातील आ को ला /टो ला येथे, भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघटना नागपूर शाखा भंडारा, " मोहा डी तालुका महिला समिती, आको ला ग्रामवासी अंतर्गत, सर्व स्तरीय भव्य कलाकार मेळावा दिनांक - 9 फेब्रुवारी 2026 रोजी सोमवारला सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष - ग्रामपंचायत सरपंच अल्का सुभाष तितरमारे प्रामुख्याने उपस्थित होते, कार्यक्रमाचे उद्घाटक - मुख्याध्यापक सहसराम गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले, प्रमुख पाहुणे म्हणून - सुप्रसिद्ध गायिका पल्लवी नगराळे ( भारतीय लोक कलाकार संघटना महाराष्ट्र सचिव ) भिमशाहिर तथा पत्रकार प्रदीप कडबे, शाहीर संजय मते जिल्हा सचिव, सामाजिक कार्यकर्त्या तथा गायिका नीलकमल गोंडाने, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक - संजू टीकापा चे तालुका संघटक, मोहाडी तालुका महिला समितीच्या सर्व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलित करून करण्यात आली. याप्रसंगी मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील अबोध भजन मंडळाच्या गायिका नीलकमल गोंडाने यांचा पुष्पगुच्छ प्रमाणपत्र शाल देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला नलु मते, संगीता बांते, सारिका सेलो क र, निराशा मते, रोशनी मते, पल्लवी काळे, नीलकमल गोंडाने, वच्छला भुरे, इत्यादी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - शाहीर संजय मते यांनी केले, आभार प्रदर्शन - संजू टीका पाचे यांनी केले, गावातील नागरिक कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 टिप्पण्या