Ticker

6/recent/ticker-posts

बाळासाहेब ठाकरे गेट समोरील चौकात ट्रॉफीक पोलिसांची नेमणूक करा

ग्राहक पंचायत महाराष्ट्ची मागणी 


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा भद्रावती, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने पोलिस निरीक्षक भद्रावती यांना चंद्रपूर-नागपूर महामार्गाच्या समस्याविषयी निवेदन देण्यात आले.
     चंद्रपूर-नागपूर महामार्गावर बाळासाहेब ठाकरे गेट समोरील चौकात वाढती वाहतूक कोंडी, अपघात रोखण्यासाठी सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८.३० या वेळात किमान दोन ट्रॉफीक पोलिसांची नियमित नेमणूक करावी. तसेच मुख्य महामार्गावर बस स्टैंड चौक ते चंदनखेडा फाटा या भागात जड वाहनांना पार्किंगसाठी बंदी करण्यात यावी तसेच हा भाग “नो पार्किंग झोन” म्हणून घोषित करण्यात यावा अशा मागण्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा भद्रावतीच्या वतीने करण्यात आल्या.
     यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावतीचे अध्यक्ष, प्रवीण चिमूरकर, उपाध्यक्ष, डॉ. ज्ञानेश हटवार, कोषाध्यक्ष भारत खोब्रागडे, सहसचिव सौ. करुणा मोघे, संघटक सोनल वावरे व सदस्य विनोद ठमके, प्रतिक्षा बनकर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या