Ticker

6/recent/ticker-posts

विश्वास'आंतरमहाविद्यालयन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
पुणे :-इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान निमसाखर ता. इंदापूर संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बुधवार दि.११ जानेवारी २०२६ रोजी 'विश्वास'आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी दिली. कीर्तनपरंपरा: बदलते स्वरूप,ए आय( AI ):आजचे युग, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण:प्रभाव आणि परिणाम,लोकशाही: लोकांची सत्ता की सत्ताधाऱ्यांचा खेळ?,आर्थिक महासत्ता: सत्य की स्वप्न,आजच्या युवकांसमोरील आव्हाने इ. वक्तृत्व स्पर्धेचे विषय असून प्रथम क्रमांकासाठी रु. १००००,द्वितीय क्रमांकासाठी रु. ७०००,तृतीय क्रमांकासाठी रु. ५००० रोख रक्कम व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय (कला, वाणिज्य व विज्ञान) कळंब-वालचंदनगर, ता. इंदापूर,जि.पुणे या ठिकाणी स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
तरी स्पर्धेमध्ये जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांच्याकडून करण्यात येत आहे.स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी७०२०८९६४७५,८४११९३७१२०या क्रमांकावर संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या