चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड:-हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु येथे रमाई स्वयंसहायता महिला बचत समूहातर्फे दि ७ फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन करण्यात आले.
या माता रमाई यांच्या जयंती कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रमाई स्वयंसहायता महिला बचत समूहाच्या अध्यक्ष कालिंदाबाई नारायण वाठोरे या होत्या.यावेळी दलित पँथर चे हिमायतनगर तालुकाअध्यक्ष तथा पत्रकार विजय वाठोरे यांनी माता रमाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.प्रस्तावना व बुद्ध वंदना अनिल कांबळे यांनी घेतली.यावेळी सामूहिक बुद्ध वंदना घेऊन माता रमाई यांना अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास उपाध्यक्ष शांताबाई गौतम कांबळे,सरस्वताबाई कांबळे,प्रभावती कांबळे,चंद्रकला वाठोरे,नयना शेवाळे, अनिल कांबळे,बालाजी कांबळे,नेहा वाठोरे, दक्ष कवडे,साकेत कांबळे,यश कांबळे, संघर्ष वाठोरे यांच्यासह आदिजण उपस्थित होते.



0 टिप्पण्या