Ticker

6/recent/ticker-posts

सुप्रसिद्ध शाहीर अरुण मेश्राम यांचा गायनातून रसिक मंत्रमुग्ध. जाहीर सत्कार


चित्रा न्युज प्रतिनिधी 
रामटेक : तालुक्यातील रामसागराचा मध्यभागी असलेल्या निसर्ग रमणीय वातावरणामध्ये, गोसाई बाबा मंदिरात दरवर्षीप्रमाणे दिनांक - 15 ते 16 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक उत्कृष्ट शेतकरी सुधाकर देशमुख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला विदर्भ उपप्रमुख महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे, तथा सुप्रसिद्ध शाहीर अरुण मेश्राम पिंड के पार आणि संपूर्ण संच, शंकर मोतकर, भाऊराव चाणे कार, रवींद्र मेश्राम, दिलीप मेश्राम, भाऊराव राऊत, शाहीर अरुण मेश्राम यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. गोसावी बाबा देवस्थान संपूर्ण परिसरातील शेतकरी बांधवांचे श्रद्धास्थान आहे. शाहीर अरुण मेश्राम यांनी शेतकरी बांधवांच्या परिस्थितीवर ' देश विकास का तेरा है सर पे भा र हॆ ' भारत की शान का तुही तो कर्णधार है ' जिंदाबाद मजूर, किसान जिंदाबाद, जिंदाबाद मजुर किसान जिंदाबाद हे, गीत सादर करून वस्तुस्थिती  मांडण्याचा प्रयत्न केला. सदर कार्यक्रमाला हिरालाल बदन, भैय्यालाल बदन, अक्षय देशमुख, करण वासनिक, भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे इत्यादी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या