----------------------
देवणी : 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून जगभरात मोठ्या उत्सवात साजरा केला जातो महिलांच्या सामाजिकआर्थिक सांस्कृतिकआणि राजकीय कार्याचा गौरव करणाराआणि त्याच्या हक्कासाठी समानता सुरक्षिततेसाठी लढा देणाराआंतरराष्ट्रीय दिवस आहे
वीटभट्टी, शेतमजूर, म्हणून काम करणाऱ्या वेटबिगार महिला या लाडक्या बहिणीच्या जीवनातील 8 मार्च हा जागतिक महिला दिन कोणी पळवला हा प्रश्न अनुतरित आहेत आजही बहुतांशी महिला आपल्या कुटूंबातील रोजी रोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी रखरखत्या उन्हात तळपत आहे त्याच्या जीवनातील 8 मार्च जागतिक दिनाच महत्व काय....? असाच प्रश्न उपस्थितीत होतो आहे
20 व्या शतकाच्या सुरुवातीला कामगार चळवळीतून या दिनाची सुरवात झाली 1975 मध्ये या दिनाला संयुक्त राष्ट्रानी मान्यता दिली
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय महिलांना कायदेशीर अधिकार शिक्षण आणि सन्मान मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक योगदान दिले त्यानी हिंदू कोड बिलाद्वारे महिलांना मालमत्तेचाअधिकार घटस्फोट आणि दत्तक घेण्याचे समान अधिकार मिळवून दिले भारतीय संविधानातील कलम 14, 15 आणि 26 द्वारे महिलांना पुरुषाच्या बरोबरीने समान हक्क मिळवून देऊन भेदभावाला प्रतिबंध घातला महिलांना कामाचे तास कमी करून दिले महिलांना प्रसूती रजेची तरतूद केली 8 मार्च 1917 रोजी रशियन महिलांनी भाकरी आणि शांततेसाठी संप केला होता हा दिवस महिलांच्या संघर्षाची आठवण करून देते या दिना निमित्याने रॅली चर्चा सत्रे आयोजित केले जातात त्यांना सन्मानार्थ पुरस्कार दिले जाते मात्र आजही ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न सुटले का?नाहीत तेव्हा डॉ. बाबासाहेब म्हणाले होते "*मी समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून मोजतो* असे म्हणत त्यानी स्त्री शिक्षणावर जोर दिला स्त्रीमध्ये शिक्षण संघटनआणि आत्मसन्मान निर्माण केला त्या सर्व तरतुदी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत नमूद करून ठेवल्या असे असताना देवणी सारंख्या ठिकाणी आठ दहा महिने घनकचारा व्यवस्थाप्नात काम करूनही त्यांचा मोबदला मिळत नाही आंदोलन धरणे उपोषण करून आपल्या हक्काच्या वेतनसाठी आत्मदहन करावे लागत असेल तर महिलांचा खरा सन्मान देवणी नगर पंचायतचं करीतआहे असे म्हणावे लागेल हे मात्र खरे....!
गिरीधर गायकवाड


0 टिप्पण्या