Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत सरसम(बु.) येथे समाधान शिबिर संपन्न..

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन दिनांक ७ मार्च २०२६ रोजी महसूल मंडळ सरसम (बु.), ता. हिमायतनगर येथे करण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराला माननीय उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार पल्लवी टेमकर (हिमायतनगर) तसेच तालुका स्तरावरील सर्व विभाग प्रमुख (HOD) आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते. विविध विभागांच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचे तत्काळ निराकरण करण्यात आले.
शिबिरामध्ये नागरिकांना रहिवाशी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जिवंत ७/१२, आरोग्य प्रमाणपत्र, बालसंगोपन किट, भूविकास बँक बोजा कमी करण्याबाबत मार्गदर्शन, कृषी अवजारे तसेच विविध शासकीय योजनांचे लाभ देण्यात आले. तसेच वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले.
यावेळी संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना अंतर्गत मंजुरी आदेशांचेही वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास काँग्रेस तालुका अध्यक्ष गजानन सूर्यवंशी,करंजीकर सरसमचे सरपंच अॅड. अतुल वानखेडे, माजी सरपंच सुनील वानखेडे, उपसरपंच साईनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सरसम (बु.) मंडळातील नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.
या समाधान शिबिरामुळे अनेक नागरिकांच्या समस्या तात्काळ मार्गी लागल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या